AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI EMI : पुन्हा महागाईचा फटका, आरबीआयने रेपो दरात केली वाढ

RBI EMI : आरबीआयने अपेक्षेप्रमाणे रेपो दरात वाढ केली. गेल्या सोमवारपासून सुरु असलेल्या पतधोरण समितीच्या अहवालानंतर आरबीआयने रेपो दरात वाढीचा निर्णय घेताल. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे.

RBI EMI : पुन्हा महागाईचा फटका, आरबीआयने रेपो दरात केली वाढ
| Updated on: Feb 08, 2023 | 10:49 AM
Share

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा महागाईचा (Inflation) फटका बसणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच संपली. या बैठकीतील निर्णयाची माहिती रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी दिली. त्यानुसार रेपो दरात (Repo Rate) 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर आता रेपो दर 6.25 टक्क्यांहून 6.50 टक्के इतका झाला आहे. महागाई आटोक्यात येत असल्याने रेपो दरात मोठी वाढ करण्यात आलेली नाही. रेपो दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना कर्ज पुन्हा महाग मिळतील. तर ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना वाढीव ईएमआयचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या खिशावर पुन्हा भार पडणार आहे. महागाईपासून सूटका होण्यासाठीचा हा उपाय जनतेला मात्र महागाईत लोटत आहे.

महागाई आटोक्यात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) कडक पाऊलं उचलली आहेत. त्याचा फटका अर्थातच जनतेलाच बसत आहे. मध्यमवर्गाला या महागाईने होरपळून काढले आहे. प्रत्येक गोष्टीत हात आखडता घ्यावा लागत असल्याने त्यांची घुसमट होत आहे. आज आरबीआयच्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीच्या तिसऱ्या दिवशी अखेर रेपो दरात वाढीची घोषणा करण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पानंतरची पहिली बैठक आहे. तसेच चालु आर्थिक वर्षातील ही शेवटची बैठक आहे.

आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता.

सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर आला. खाद्यान्न आणि अन्नधान्यांच्या किंमती झाल्याचा हा परिणाम होता.

7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी आरबीआयने रेपो दरात 2.25 टक्के वाढ केली होती.

आरबीआय गव्हर्नर यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा जीडीपी दर 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर महागाई दर आर्थिक वर्ष 2023-24 साठी 4 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जागतिक अर्थव्यवस्था आणि महागाईचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडल्याचे सांगितले. जागतिक आव्हाने असतानाही भारतीय अर्थव्यवस्था गतिमान असल्याचा दावा ही त्यांनी केला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?