रिलायन्स इंडस्ट्रीला दुसऱ्या तिमाहीत 11262 कोटींचा फायदा

रिलायन्स इंडस्ट्रीला यंदाच्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 11 हजार 262 कोटींचा फायदा (Reliance big profit second quarter) झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा फायदा 18.34 टक्क्यांनी वाढला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीला दुसऱ्या तिमाहीत 11262 कोटींचा फायदा


मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीला यंदाच्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 11 हजार 262 कोटींचा फायदा (Reliance big profit second quarter) झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा फायदा 18.34 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 च्या दुसऱ्या तिमाहीत रिलायन्सचा फायदा 9 हजार 516 कोटी (Reliance big profit second quarter) होता.

रिलायन्स जिओचा प्री-टॅक्स फायदा जुलै-सप्टेंबरमध्ये 21 टक्क्यांनी वाढला असून 3 हजार 222 कोटी रुपये झाला आहे. रोख फायदा 18 टक्क्यांनी वाढून 18 हजार 305 कोटी रुपये झाला आहे. तसेच कंपनीला या तिमाहीत रेकॉर्ड ब्रेक फायदा झाला आहे, असं रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी यांनी सांगितले.

“हे चांगले परिणाम तेल आणि रसायनांपर्यंतच्या व्यवसायात आम्हाला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. तसेच जिओच्या व्यवसायातही ग्राहकांची वाढ झाली आहे. त्यामुळे हा आर्थिक फायदा झाला”, असं मुकेश अंबानी यांनी सांगितले.

दरम्यान, सध्या सर्व टेलिकॉम नेटवर्कमध्ये रिलायन्स जिओला मोठी मागणी आहे. त्यामुळे कंपनीने एअरटेल, वोडाफोनसहीत सर्व स्पर्धकांना मागे टाकत सर्वाधिक युजर्स असलेले नेटवर्क म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. सर्व टेलीकॉमच्या तुलनेत सध्या जिओचे सर्वाधिक युजर्स आहेत. ऑगस्टमध्ये कंपनीने 84 लाख नवीन युजर्स जोडले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI