AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदेव बाबांना आले ‘अच्छे दिन’ रुची सोयाने फेडलं 3000 कोटींचं कर्ज

रामदेव बाबा यांची रुची सोया कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. शुक्रवारी 8 एप्रिल रोजी कंपनीने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की त्यांनी जवळपास 2925 कोटी रुपयांचे लोन फेडलं आहे.

रामदेव बाबांना आले ‘अच्छे दिन’ रुची सोयाने  फेडलं 3000 कोटींचं कर्ज
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 09, 2022 | 11:19 AM
Share

रामदेव बाबा (Ramdev Baba) यांची रुची सोया (Ruchi Soya) ही कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त झाल्याचे कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. शुक्रवारी कंपनीने याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार, रुची सोया कंपनीने 2925 कोटी रुपयांचे लोन फेडले आहे. पतंजलि (Patanjali) आयुर्वेद लिमिटेडचे डायरेक्टर आचार्य बाळकृष्ण यांनी याबाबत एक ट्वीट करत अधिक माहिती देताना सांगितले, की रुची सोया आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. कंपनीने मुदतीच्या आत 2 हजार 925 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. दरम्यान, नुकतात रुची सोयाचा आयपीओ आला असून तो 4300 कोटी इतका होता. कंपनीने या रकमेचा काही भाग कर्ज फेडण्यासाठी दिला आहे. कंपनीच्या प्रवक्यांनी सांगितले, की एफपीओसाठी जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, रुची सोया केवळ 1950 कर्ज फेडणार होती. परंतु नंतर कंपनीने संपूर्ण 2925 कोटी रुपये कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला व त्यातून कंपनी पूर्णत: कर्जमुक्त झाली आहे.

रुची सोयाचे शेअर लिस्टेड

दरम्यान, शुक्रवारी रुची सोयाचे शेअर बाजारात लिस्टेड झाले आहे. यानंतर रुची सोयाचे समभाग पहिल्याच दिवशी तब्बल 13 टक्क्यांच्या वृध्दीनंतर बंद झाले. आयपीओची खुलत्या बाजारातील किंमत ही 650 रुपये एवढी होती. त्यामुळे ज्यांनी याच भावात शेअरची खरेदी केली त्यांना पहिल्याच दिवशी तब्बल 36 टक़्के परतावा मिळाला आहे. कंपनी कर्जमुक्त झाल्यानंतर याचा कंपनीच्या समभागांना चांगला फायदा होउन गुंतवणूकदारांचा विश्‍वास वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, जर कुठल्या गुंतवणूकदाराला कमी कालावधीसाठी गूंतवणूक करायची असेल तर त्यांना पहिल्यांदा आपला नफा मिळवूण घ्यायला हवा. तर दीर्घकाळ गुंतवणूक करणार्यांनीदेखील यात जास्त काळासाठी गुंतवणूक केली पाहिजे.

…तर समभाग 1000 पार

इकोनोमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, स्वास्तिक इन्व्हेस्टमेंटचे रिसर्चप्रमुख संतोष मीना यांनी सांगितले, की कमी कालावधीचा विचार करता या शेअरमध्ये गुंतवणूकदार अधिक गुंतवणूक करेल अशी शक्यता आहे. जर गुंतवणूकदारांनी विक्रीचा निर्णय घेतला तर याला 700 रुपयांच्या एक मजबूत सपोर्ट मिळू शकतो. दरम्यान, जीसीएल सिक्युरिटज्‌चे रवी सिंघल यांनी सांगितले, की जर गुंतवूणकदारांनी यातून तात्पुरती कमाई करण्यासाठी यामध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांना यातून बाहेर पडायला पाहिजे. काहींनी यात दीर्घ गूंतवूणकीच्या हिशोबाने गुंतवणूक केली असेल तरी त्यांनी 50 टक़्क्यांच्या होल्डिंगवर आपला नफा बूक करायला हवा. तर उर्वरीत 50 टक्के गुंतवणूकीसाठी ठेवायला हवेत.

संबंधित बातम्या

Reserve Bank of India : सामनाच्या अग्रलेखातून रिझर्व्ह बॅंकेवरती टीका, निवडणुकांमुळे इंधन दरवाढ कशी रोखून ठेवली

Russia-Ukraine war : भारतातून गहू, साखरेची निर्यात वाढली, भावात तेजीचे संकेत

Petrol-Diesel Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सलग तीसऱ्या दिवसी इंधनाचे दर स्थिर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.