Rule Change: LPG पासून ते सिगरेटपर्यंत…1 फेब्रुवारीपासून हे मोठे बदल; प्रत्येक घर, प्रत्येक खिशावर परिणाम
Rule Change From 1st February: 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. तर त्याचबरोबर या तारखेपासून अनेक मोठे बदल पण होतील. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. LPG Cylinder च्या किंमतीपासून ते टोल नाक्यावरील FASTag च्या नियमापर्यंत अनेक बदल होत आहे.

Rule Change From 1st February: जानेवारी महिना संपत आलेला आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या रविवारी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. नवीन महिन्यात देशासाठी अनेक गोष्टी बदलतील. काही नियमात बदल होईल. तर एलपीजीपासून ते सिगारेटपर्यंत अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. एक तारखेला एलपीजी सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर होतील. त्याचा थेट परिणाम प्रत्येकाच्या घरावर आणि हॉटेलिंगवर दिसेल. पान मसाला, सिगारेट पिणाऱ्यांना मोठा झटका बसेल.
LPG Cylinder ची किंमत
एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत सरकारी ऑईल कंपन्या सतत बदल करकतात. 1 फेब्रुवारी 2026 रोजी सिलेंडरच्या नवीन किंमती लागू होतील. बजेट याच दिवशी जाहीर होणार असल्याने या किंमतीत मोठी कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकार सर्वसामान्यांना गिफ्ट देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यात UAE चे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या धावता दौऱ्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.
14 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किंमती उतरण्याची शक्यता आहे. तर 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत सतत बदल होत आहे. गेल्यावेळी व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये दिल्लीत 14.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. 1804 रुपयांवर किंमती आल्या होत्या. तर CNG-PNG आणि ATF च्या किंमतीवर पण परिणाम होण्याची शक्यता आहे.
पान-मसाला-सिगारेट
तर सर्वात मोठा झटका हा पान-मसाला, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा शौक असणाऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका वृत्तानुसार, देशात 1 फेब्रुवारी 2026 रोजीपासून तंबाखूजन्य उत्पादने आणि पान मसालवर अधिक कर लावण्यात येणार आहे. त्याविषयीची अधिसूचना पण आली आहे. या अधिसूचनेनुसार, तंबाखू आणि पान मसाला पदार्थांवर, उत्पादनांवर नवीन शुल्क आकारल्या जाणार आहे. तर जीएसटीचे अतिरिक्त दर पण या उत्पादनांवर लागू असतील. पान मसाला, सिगारेट सह इतर तंबाखूजन्य पदार्थांवर आता आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लावण्यात आला आहे.
FASTag च्या नियमात बदल
FASTag युझर्ससाठी 1 फेब्रुवारी 2026 रोजीपासून नियमात बदल होईल. NHAI ने फास्टॅग व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केली आहे. कार, जीप आणि व्हॅनसाठी ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने आणि त्यासाठी सक्ती करणार नसल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर या महिन्यात रविवार आणि शनिवार गृहित धरत एकूण दहा दिवस विविध कारणांनी बँका बंद असतील. फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
