Russia Ukraine War : कच्च्या तेलाच्या दरात रेकॉर्ड ब्रेक तेजी, जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे भाव

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. युद्धाचा बाजारपेठेवर दबाव दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये सातत्याने चढ उतार पहायला मिळत आहे. काल म्हणजेच चार मार्च रोजी कच्च्या तेलाचे दर काही प्राणात कमी झाले होते. शुक्रवारी कच्च्या तेलाचे दर 111.5 डॉलर प्रति बॅरल होते. मात्र एकाच दिवसात त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. आज कच्च्या तेलाचे दर 118 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.

Russia Ukraine War : कच्च्या तेलाच्या दरात रेकॉर्ड ब्रेक तेजी, जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे भाव
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 9:32 AM

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. युद्धाचा बाजारपेठेवर दबाव दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये सातत्याने चढ उतार पहायला मिळत आहे. काल म्हणजेच चार मार्च रोजी कच्च्या तेलाचे दर काही प्राणात कमी झाले होते. शुक्रवारी कच्च्या तेलाचे दर 111.5 डॉलर प्रति बॅरल होते. मात्र एकाच दिवसात त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. आज कच्च्या तेलाचे दर 118 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. जागतिक बाजारपेठेत सातत्याने कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ – उतार पहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे भारतात गेल्या 122 दिवसांपासून पेट्रोल,डिझेलचे (Petrol and Diesel) दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांकडून (Oil Marketing Companies) शनिवारी इंधनाचे दर जाहीर करण्यात आले. मात्र त्यात कोणताही बदल करण्यात आला नसून, भाव स्थिर आहेत. दरम्यान पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर इंधनाचे दर वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

शनिवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 109. 98 रुपये तर डिझेल 84. 24 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91.43 रुपये लिटर आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95. 41 रुपये एवढे असून, डिझेलसाठी 86.67 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या तरी देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ही दरवाढ अशीच राहिली तर येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्याप्रमाणात वाढू शकतात.

देशात चार महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर

देशात गेल्या चार महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्याने चार नोव्हेंबर 2021 ला पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर गगणाला भिडले आहेत, मात्र भारतात इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. मात्र येत्या दहा मार्चला पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आहेत, त्यानंतर दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक कशी कराल? जाणून घ्या गुंतवणुकीचे विविध प्रकार

पुढील दोन महिने देशात खाद्यतेलाचा तुटवडा जाणवणार नाही; खाद्यतेल पुरवठा उद्योजकांचे सरकारला अश्वासन

रशिया-युक्रेन युद्धाची धग थेट किचनपर्यंत, सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.