AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाईक विकत घेण्याचा करत असाल प्लॅन, तर ‘ही’ खास ऑफर तुमच्यासाठी

एसबीआय ईजी राइड प्री-अप्रूव्ड टू-व्हीलर लोन मिळवण्यासाठी तुम्हाला बँकेचे जे नियम आहे त्याची पूर्तता  करावी लागणार आहे. या ऑफरमुळे लोनची थेट रक्कम त्वरित डीलरच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल.

बाईक विकत घेण्याचा करत असाल प्लॅन, तर 'ही' खास ऑफर तुमच्यासाठी
लोन ऑफर
| Updated on: Jan 30, 2022 | 7:39 PM
Share

जर तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्यासाठी टू व्हिलर (Two Wheeler) खरेदी करायची इच्छा असेल किंवा तसा प्लॅन असेल तर  ही बातमी तुमच्यासाठी आहे. ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) घेऊन आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना शानदार व्याजावर टूव्हीलर लोनची ऑफर देत आहे. बँकेद्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या या टू-व्हीलर लोनचे नाव एसबीआय ईजी राइड असे आहे. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या विशेष ऑफरचा लाभ फक्त तेच ग्राहक घेऊ शकणार आहेत, ज्यांचे या बँकेत आधीपासूनच खाते आहे.  या विशेष ऑफर संबंधित जे काही नियमावली आहे ती बँकेने आधीच निर्धारित केली आहे, म्हणूनच या ऑफरचा फायदा फक्त या बँकेतील खाते धारकांनाच मोठ्या प्रमाणात होणार आहे. जर बँकेने निर्धारित केलेल्या नियमावलीमध्ये तुम्ही बसत असाल तर अशा वेळी फक्त बँकेच्या YONO मोबाईल ॲप (Mobile App) वर जाऊन काही मिनिटांमध्येच तुम्ही हे लोन प्राप्त करू शकता.

लोनची खास वैशिष्ट्ये

ईजी राइड लोन ऑफरच्या अंतर्गत 20 हजार रुपये ते 3 लाख रुपये पर्यंत तुम्हाला लोन मिळते. जे लोन फेडण्यासाठी जास्तीत जास्त 48 महीने म्हणजेच 4 वर्षाचा कालावधी दिला जातो.

ईडी राइड टू-व्हीलर लोनच्या सुरुवातीचा व्याज दर 9.35 %एव्हढा असेल.

ग्राहकाच्या लोन एलिजिबिलिटी आधारावर बाइक वर ऑन-रोड प्राइस अंतर्गत तुम्हाला 85 टक्के पर्यंत लोन मिळू शकते.

– योनो मोबाइल ॲप च्या माध्यमातुन तुम्ही केव्हाही लोनसाठी अप्लाय करू शकता. या लोनसाठी तुम्हाला बँकेच्या ब्रँच मध्ये जाण्याची आवश्यकता नाही.

प्री-अप्रूव्ड टू-व्हीलर लोन ऑफर अंतर्गत लोनद्वारे मिळालेली रक्कम थेट डीलरच्या खात्यात जमा केली जाईल.

जर तुम्ही 31 मार्च, 2022 आधी या ऑफर चा लाभ घेऊन लोनसाठी अप्लाय केले तर तुमची प्रोसेसिंग फी सुद्धा माफ केली जाईल.

लोन एलिजिबिलिटी

एसबीआय ईजी राइड प्री-अप्रूव्ड टू-व्हीलर लोन मिळिण्याकरिता तुम्हाला बँकेने जी नियमावली तयार केलेली आहे, त्या नियमावलीमध्ये तुमचा समावेश असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमची एलिजिबिलिटी चेक करायची असेल तर अशावेळी 567676 क्रमांकावर PA2W<space><बँक खात्याचे शेवटचे 4 अंक> लिहून sms करा. असे केल्याने लोन संदर्भातील एलिजिबिलिटी संबंधातील सर्व माहिती तुम्हाला मिळेल.

लोनसाठी असे करा अप्लाय

सर्वात आधी तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये एसबीआय चे YONO ॲप डाउनलोन करावे लागेल.

आता ॲपमध्ये तुमचे अकाऊंट बनवून लॉगिन करा

ॲपमध्ये दाखवत असलेल्या ऑफरला भेट देऊन Apply ऑप्शन वर क्लिक करा.

सर्व आवश्यक असलेले डिटेल्स जसे की पर्सनल डिटेल्स आणि आपल्या कामा संदर्भातील माहिती समाविष्ट करा.

आता आपल्या आवडीच्या बाईकचे मॉडेल आणि डीलर निवडा त्यानंतर बाईकची किंमत टाका.

आता समाविष्ट केलेल्या सर्व माहितीला एकदा तपासून पहा आणि त्यानंतर नियम आणि अटी यांचा स्वीकार करा.

शेवटी ओटीपी नंबर येईल तो टाका आणि लोनची रक्कम प्राप्त करा.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या प्री-अप्रूव्ड टू-व्हीलर लोन ऑफर बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत साइटवर अवश्य भेट देऊ शकता.

संबंधित बातम्या 

आर्थिक स्थिती हलाखीची असताना सुद्धा या पाच स्मॉलकॅप स्टॉक्स ने गुंतवणूकदारांचा पैसा केला तीनपट सोबतच कवमला भरघोस पैसा!!

मातृत्व की नोकरी: महिला आयोगानं टोचले कान, स्टेट बँकेचा निर्णय मागे

सीमेवर धुसफूस मात्र चीनशी व्यापारी सख्य कायम; निर्यातीत 34 टक्क्यांची वाढ, आयात 28 टक्क्यांनी वाढली

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.