SBI अलर्ट | Instant Loan App पासून सावधान, पैशांची गरज असल्यास ‘हे’ करा

SBI अलर्ट | Instant Loan App पासून सावधान, पैशांची गरज असल्यास 'हे' करा

इन्स्टंट लोनच्या नावाखाली ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रासपण घडत आहेत. फसवेगिरीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले आहे. (SBI fraudulent instant app)

prajwal dhage

| Edited By: Team Veegam

Jan 16, 2021 | 3:53 PM

मुंबई : सध्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीचा वाईट पद्धतीने अपयोग करुन नागरिकांची लूट करण्याचे प्रकार सर्रासपणे केले जातायत. इन्स्टंट लोनच्या नावाखाली ग्राहकांना लुबाडण्याचेही प्रकार सर्रासपण घडत आहेत. त्यामुळे फसवेगिरीचे हे वाढते प्रकार लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले आहे. इन्स्टंट लोनची ऑफर तुमच्यासाठी एक ट्रॅप असू शकतो असे एसबीआयने म्हटलंय. (SBI said that be aware about fraudulent instant app)

तत्काळ लोन देण्यासाठी सध्या अनेक प्रकारचे अ‌ॅप (Instant Loan App) बाजारात अपलब्ध आहेत. या अ‌ॅप्सच्या माध्यमातून ग्राहकांना लोन देण्यात येते. यावेळी लोन प्रोसेसिंगच्या नावाखाली ग्राहकांकडून मोठी रक्कम वसूल केली जाते. तसेच अशा लोनमध्ये व्याजाचा दरही जास्त असतो. त्यामुळे एसबीआयने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. इन्स्टंट लोनच्या माध्यमातून दिलेल्या लोनची परतफेड करता आली नाही तर कित्येकांना धमकीचे फोन कॉल्स येण्याचे प्रकारही समोर आले आहेत.

त्यामुळे एसबीआयने ट्विटच्या माध्यमातून ग्राहकांना सेफ्टी टिप्स दिल्या आहेत. मोबाईल फोन किंवा कॉम्प्यूटरवर कोणतीही लिंक आल्यानंतर त्यावर क्लिक न करण्याचे एसबीआयने सांगितलं आहे.

>> लोनसाठी अर्ज करण्याआधी त्यासाठीचे नियम आणि ऑफर यांची माहिती करुन घ्या.

>> संदिग्ध वाटणाऱ्या लिंकवर क्लिक करु नये.

>> कोणतेही अ‌ॅप डाऊनलोड करण्याअगोदर अ‌ॅपची विश्वासार्हता तपासा.

एसबीआय बँकेने सांगितलं आहे की ग्राहकांना कोणतीही अडचण असेल  किंवा काही मदत हवी असले तर त्यांनी https://bank.sbi या लिंकवर जाऊन आपल्या शंकांचे समाधान करुन घ्यावे.

संबंधित बातम्या :

Special Story ! सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण; ‘या’ सरकारी विभागात बंपर भरती!

Income Tax Return साठी उरले काही तास, मुदतीनंतर दुप्पट दंडाचा दणका

ऑनलाईन व्यवहारात खातेदाराची चूक नसेल तर काय? NCDRC चा मोठा निर्णय

(SBI said that be aware about fraudulent instant app)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें