Sensex | शेअर बाजाराची उसळी, 2200 अंकांनी मुसंडी

कॉर्पोरेट कर (Corporate Tax) कमी केल्यानंतर मुंबई शेअर बाजारात (Sensex) उत्साह पाहायला मिळत आहे. कॉर्पोरेट इंडियाला 1.5 लाख कोटीचं पॅकेज जाहीर होताच, सेन्सेक्सने (Sensex) तब्बल 2200 अकांनी मुसंडी मारली.

Sensex | शेअर बाजाराची उसळी, 2200 अंकांनी मुसंडी

मुंबई : कॉर्पोरेट कर (Corporate Tax) कमी केल्यानंतर मुंबई शेअर बाजारात (Sensex) उत्साह पाहायला मिळत आहे. कॉर्पोरेट इंडियाला 1.5 लाख कोटीचं पॅकेज जाहीर होताच, सेन्सेक्सने (Sensex) तब्बल 2200 अकांनी मुसंडी मारली. त्यामुळे सेन्सेक्स 38 हजार 300 अंकांपर्यंतच पोहोचला. इतकंच नाही तर राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही 650 अंकांची वाढ झाली. त्यामुळे निफ्टी 11 हजार 350 च्या वर गेला.

यंदा 20 मे नंतर पहिल्यांच शेअर बाजारात इतका उत्साह पाहायला मिळत आहे. 2019 लोकसभा एक्झिट पोलनंतर सेन्सेक्सने भरारी घेतली होती. त्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कॉर्पोरेट कर कपात केल्याने, त्याचे सकारात्मक बदल सेन्सेक्समध्ये पाहायला मिळाले.

2200 अंकांची उसळी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कॉर्पोरेट टॅक्स कपात आणि भांडवली नफ्यावरील सरचार्ज हटवण्याची घोषणा केली. त्याचा परिणाम म्हणून सेन्सेक्स 2200 अंकांनी वधारला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI