AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेन्सेक्सची 3 दिवसात 4614 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली शेअर बाजारातील तेजी शुक्रवारीही कायम होती. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 28.65 लाख कोटी रुपयांची मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला. निवडणूक निकाल अपेक्षेपेक्षा कमी पडल्यानंतर मंगळवारी बाजार सुमारे 6% ने घसरल्यानंतर ही वाढ झाली.

सेन्सेक्सची 3 दिवसात 4614 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ
शुक्रवारी 30 शेअरचा बीएसई सेन्सेक्स 1.08 अंकाची घसरण झाली. तो 80,981.95 अंकावर बंद झाला. तर एनएसई निफ्टीमध्ये 1.17 टक्क्यांची घसरण होऊन तो 24,717.70 अंकावर बंद झाला.
| Updated on: Jun 07, 2024 | 10:05 PM
Share

शेअर बाजारात गेल्या तीन दिवसात तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारपर्यंत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 28.65 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या तीन दिवसांमध्ये प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने 4,614.31 अंकांनी वाढून विक्रमी उच्चांक गाठलाय. निवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने मंगळवारी बाजारात सुमारे सहा टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. पण नंतर शेअर बाजारातील मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवल बुडाले होते. मात्र, दुसऱ्याच दिवसापासून बाजाराने पुनरागमन केले आणि शुक्रवारपर्यंत त्याची वाढ कायम राहिली.

शेअर बाजारातील लक्षणीय पुनरागमनामुळे, तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल रु. 28,65,742.36 कोटींनी वाढून रु. 4,23,49,447.63 कोटी ($ 5.08 लाख कोटी) झाले आहे.

आज सेन्सेक्स 1,618.85 अंकांनी वधारला

शुक्रवारी बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,720.8 अंक म्हणजे 2.29 टक्क्यांनी वाढून 76,795.31 वर पोहोचला आहे. नंतर तो 76,693.36 अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला, मागील सत्राच्या तुलनेत तो 1,618.85 अंकांनी म्हणजेच 2.16 टक्क्यांनी वाढला आहे.

शेअर बाजार का वाढला?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे आपले प्रमुख व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवले आहेत. मजबूत आर्थिक वाढीदरम्यान केंद्रीय बँकेचे लक्ष महागाईवर आहे. यामुळे नव्या मोदी सरकारसाठी सुधारणांना वाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते केंद्रातील आघाडी सरकारमध्ये स्थिरतेच्या आशेमुळे आरबीआयने आर्थिक वर्ष 2024-25 साठी 7.2 टक्क्यांपर्यंत वाढीचा अंदाज सुधारित केल्यानंतर देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी होती.

कोणते शेअर्स वाढले आणि घटले

विप्रो, एलटीआयमिंडट्री, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि अदानी पोर्ट्स सारख्या समभागांनी निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ केली. तर एसबीआय लाईफ, टाटा कंझ्युमर, एल अँड टी, एचयूएल आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी (4 जून) मोठी घसरणीनंतर सेन्सेक्स गेल्या दोन सत्रांमध्ये 2,995.46 अंकांनी किंवा 4.15 टक्क्यांनी वाढला आहे. सेन्सेक्समध्ये सूचिबद्ध ३० कंपन्यांपैकी विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व्ह आणि टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले. इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, कोटक महिंद्रा बँक आणि आयटीसीच्या समभागांना तोटा सहन करावा लागला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.