Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : नव्हे बाजारगप्पा! Sensex गाठणार 1 लाखांचा टप्पा

Share Market : सध्या तुम्हाला या थापा वाटतील, पण बीएसई निर्देशांक लवकरच 1 लाख रुपयांचा टप्पा गाठेल, असा दावा करण्यात येत आहे. अर्थात हा दावा भारतीयाने नाही तर एका परदेशी फर्मने केला आहे.

Share Market : नव्हे बाजारगप्पा! Sensex गाठणार 1 लाखांचा टप्पा
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 9:51 AM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार (Share Market) नव्या विक्रमासाठी धडपडत आहे. कोरोना काळात सेन्सेक्सने विक्रमी भरारी भरली. त्यानंतर बाजाराला छेद देणे जिकरीचे ठरले आहे. बाजार एका लेव्हलच्या, टप्प्याच्या पुढे झेपावत नसल्याने हौसे, नवसे आणि गवशांनी बाजारातून कधीचाच काढता पाय घेतला आहे. पण बीएसई निर्देशांक (BSE Sensex) लवकरच 1 लाख रुपयांचा टप्पा गाठेल, असा दावा करण्यात येत आहे. अर्थात हा दावा भारतीयाने नाही तर एका परदेशी फर्मने केला आहे. अर्थात अनेक जण ही बाब हसण्यावर नेतील. पण ज्यांनी बाजार 2000, 3000,5000 अंकांवर असताना गुंतवणूक केली आहे, त्यांना हा दावा नक्कीच हस्यास्पद वाटणार नाही.

काय केला दावा जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजचे ( Firm Jefferies) प्रमुख क्रिस वूड (Chris Wood) यांनी भारतीय शेअर बाजाराविषयी ही भविष्यवाणी केली आहे. बीएसई निर्देशांक येत्या पाच वर्षांत 1,00,000 टप्पा गाठेल, असा दावा त्यांनी केला. त्यासाठी EPS मध्ये 15 टक्के वाढ होईल आणि एक वर्षांच्या आगाऊ प्रगतीचा आलेख पाहता, PE 19.8 पटीने वाढेल, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. या गृहितकावर त्यांनी ही एक लाख स्तर गाठण्याचं गणित मांडलं आहे.

आता मदार आरबीआयवर क्रिस वूड यांनी एक दावा केला आहे. त्यानुसार, रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती पुढील काही वर्षे भारतीयांना दिलासा दिला तर मोठा बदल होऊ शकतो. भारतीय कंपन्यांच्या शॉर्ट टर्म मूल्यांमध्ये घसरण होणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा कायम राहिल. इतर परदेशी बाजारांपेक्षा भारतीय बाजार स्वस्त आहेत. त्यामुळे या बाजारात गुंतवणूकदारांना फायदा होईल, असे त्यांना वाटते.

हे सुद्धा वाचा

तेजीचे सत्र शेअर बाजारात सलग दोन दिवस तेजीचे सत्र दिसून आले. गुरुवारी आणि शुक्रवारी सेन्सेक्स वधारला. गुरुवारी निर्देशांक 98.84 अंकांनी वधारला. तर निफ्टीने 35.75 अंकांची आगेकूच केली होती. सेन्सेक्समधील सहभागी 30 कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक 2.79 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. आजच्या व्यापारी सत्रात रिलायन्स, सन फार्मा हिंडाल्को आणि एचयुएलमध्ये प्रत्येकी 2% टक्क्यांची वृ्द्धी दिसून आली. तर HCL Tech, Divi’s Lab आणि Wipro यांनी छपाई केली. ONGC ने निराश केले. ग्रासिममध्ये पण गुंतवणूकदारांच्या हाती काही लागले नाही.

परदेशी बाजार चमकले आशियातील इतर शेअर बाजार, दक्षिण कोरीयाचा कॉस्पी, जपानचा निक्की आणि चीनच्या शंघाई कंपोजिटमध्ये शुक्रवारी तेजी दिसून आली. युरोपातील बाजारात सुरुवातीला सुस्ती दिसली. एक दिवसापूर्वी अमेरिकेतील बाजारात तेजीचे सत्र होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा भारतीय बाजाराकडील ओढा कायम आहे.

'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट.
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग.
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की...
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की....
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द.
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात.
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष.