Share market | गुंतवरणूकदारांच्या कमाईत 6.52 लाख कोटींची वाढ, जाणूण घ्या या आठवड्यात शेअर बाजारात काय काय घडलं?

या आठड्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6.52 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. (share market investors wealth company market capitalisation)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:06 PM, 7 Mar 2021
Share market | गुंतवरणूकदारांच्या कमाईत 6.52 लाख कोटींची वाढ, जाणूण घ्या या आठवड्यात शेअर बाजारात काय काय घडलं?

मुंबई  : देशावर कोरोना महामारीचे सावट असले तरी सध्या भांडवली बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भांडवली बाजारात चालू आठवड्यात निर्देशांकात चढउतार पाहायला मिळाला. बाजाराचे सुरुवातीचे तिन दिवस भांडवली बाजार निर्देशांकात मोठी वाढ नोंदवत बंद झाला. तर शेवटचे दोन दिवस बाजारामध्ये नकारात्मक परिणाम झाल्यामुळे निर्देशांकसुद्धा घसरल्याचे पाहायला मिळाले. (share market investors wealth and company market capitalisation information)

पूर्ण आठवड्याचा विचार करायचा झाला तर या आठवड्यात भांडवली बाजारात एकूण 1306 अंकांची वाढ नोंदवली गेली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजार 50405 अंकावर स्थिरावला. तर भारतीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी हा 14938 अंकावर येऊन थांबला. मुंबई शेअर बाजारवरील कंपन्यांचे एकूण भांडवल हे 207.33 लाख कोटी रुपये नोंदवले गेले. मागील आढवड्यात हेच भांडवल 200.81लाख कोटी रुपये होते. म्हणजेच या आठड्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6.52 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

शेअर बाजारातील टॉप 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या बाजार मुल्यात 1.94 लाख कोटींची वाढ झाली. या आठवड्यात सर्वाधिक फायदा रिलायन्स इंडस्ट्रीज या मुकेश अंबानी यांच्या कंपनीला झाला. तर दुसरीकडे एचडीएफसी बँक आणि भारतीय स्टेट बँक (एसबीआय) या कंपन्यांच्या बाजार मुल्यात घट नोंदवली गेली. या आठवड्यात डिलायन्स इंडस्ट्रीजचे भागभांडवल 60,034.51 रुपयांनी वाढून 13,81,078.86 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) जे भांडवल 41,040.98 कोटी रुपयांनी वाढून 11,12,304.75 कोटींवर पोहोचले.

या कंपन्यांच्या भांडवलात वाढ

हिंदुस्तान युनिलीव्हर कंपनीचे भांडवल 16,388.16 कोटींनी वाढून एकूण भांडवल 5,17,325.3 कोटींपर्यंत पोहोचले. तर इन्फोसीस या कंपनीचे बाजार मुल्यांकन 27,114.19 कोटींनी वाढून 5,60,601.26 कोटींवर पोहोचले. आयसीआयसीआय बँकेच्या भांडवलामध्ये 8,424.22 कोटींची वाढ नोंदवली गेली. या कंपनीचे सध्याचे भांडवल 4,21,503.09 रुपये आहे.

या कंपन्यांच्या भांडवलामध्ये घट

तर एचडीएफसी बँकेच्या बाजार मूल्यात 2,590.08 घट होऊन 8,42,962.45 वर पोहोचले. या आठवड्यात एसबीआयचे एकूण भांडवल 5,711.75 कोटी रुपायांनी घटून 3,42,526.59 कोटी रुपयांवर पोहोचले.

इतर बातम्या :

रिलायन्स होम फायनान्स डिफॉल्टरच्या यादीत, व्याजही नाही चुकवू शकली अनिल अंबानींची कंपनी

जेनेरिक मेडिकल सुरु कराल तर होईल लाखोंची कमाई, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

खाजगीकरणाच्या प्रस्तावांवर सरकारची तयारी सुरु, जाणून घ्या कोणत्या कंपन्यांवर आहे फोकस

(share market investors wealth and company market capitalisation information)