Stock Market Update Today: घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 773 अंकांनी गडगडला

सेन्सेक्स 773 अंकांच्या घसरणीसह 58,153 वर बंद झाला आणि निफ्टी 231 अंकांच्या घसरणीसह 17375 वर बंद झाला. आजच्या घसरणीचे (TOP LOSSERS) शेअर्समध्ये टेकएम, इन्फी, एचसीएलटेक, एसबीआय आणि एचडीएफसी समावेश होतो.

Stock Market Update Today: घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 773 अंकांनी गडगडला
शेअर बाजारात नेमकं काय घडतंय?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 7:56 PM

नवी दिल्ली : जागतिक अर्थघडामोडींचा भारतीय शेअर बाजारावर (STOCK MARKET) प्रतिकूल परिणाम दिसून आला. सेंन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही मोठ्या घसरणीसह बंद झाले. निफ्टी इंडेक्सवर 2.5 टक्क्यांची घसरण दिसून आली. बँक आणि फायनान्स इंडेक्सवर 1 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. आज (शुक्रवारी) शेअर बाजारात शेअर विक्रीचा मोठा दबाव दिसून आला. सेंन्सेक्सवर 30 पैकी 27 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 773 अंकांच्या घसरणीसह 58,153 वर बंद झाला आणि निफ्टी 231 अंकांच्या घसरणीसह 17375 वर बंद झाला. आजच्या घसरणीचे (TOP LOSSERS) शेअर्समध्ये टेकएम, इन्फी, एचसीएलटेक, एसबीआय आणि एचडीएफसी समावेश होतो. अमेरिकेत 10 वर्षांच्या बाँड यील्डमध्ये (BOND YEILD) 4 दशकांहून अधिक तेजी दिसून येत आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम नोंदविला गेला आहे.

आजचे वधारणीचे शेअर्स (TOP GAINERS)

1. आयओसी (1.75) 2. इंड्सइंड बँक (1.03) 3. एनटीपीसी (0.51) 4. टाटा स्टील (0.49) 5. आयटीसी (0.09)

आजचे घसरणीचे शेअर्स (TOP LOOSERS)

1. ग्रॅसिम (-3.30) 2. टेक-महिंद्रा (-2.97) 3. इन्फोसिस (-2.73) 4. एसचीएल टेक (-2.24) 5. यूपीएल (-2.19)

मार्केटवर आंतरराष्ट्रीय दबाव?

अर्थसंकल्पानंतर (UNION BUDGET) रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडं अर्थजगताच्या नजरा लागल्या होत्या. रिझर्व्ह बँकेनं रेपो दर (REPO RATE) स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील शीर्ष बँकांनी पतधोरणांत फेरबदल केले आहेत. अमेरिकनं फेड रिझर्व्हनं व्याज दरात बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शेअर मार्केट मधून विदेश गुंतवणुकदार पैसे काढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रभावामुळे शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव अधिक जाणवत आहे.

गुंतवणुकदारांनो ‘हे’ पाऊल उचला!

एस्कॉर्ट सिक्युरिटीजचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांनी टीव्ही 9 हिंदीशी बोलताना शेअर बाजारातील घसरणीला वाढत्या दरवाढीची कारणे सांगितली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर मार्केटची दिशा स्पष्ट होईल असे म्हटले होते. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार, गुंतवणुकदारांनी घसरणीवेळी खरेदी करायला हवी. गुंतवणुकदारांना एसआयपी खरेदी करायला हवी असा सल्ला दिला होता.

संबंधित बातम्या :

क्रिप्टो ट्रॅकर: कर म्हणजे मान्यता नव्हे, क्रिप्टोकरन्सीवर अर्थमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

EPFO योजना : खासगी नोकरदारांनाही पेन्शनचा लाभ, महिना 15-30 हजार पेन्शन

शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.