नवी दिल्ली : नोकरदारांकडून ‘पेन्शन स्कीम-1995’ (Pension Scheme-1995) अंतर्गत किमान निवृत्तीवेतन (Minimum Pension) वाढविण्याची मागणी केली जात आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निर्णयासाठी प्रलंबित आहे. दरम्यान, नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. EPFO सर्वोत्तम निश्चित निवृत्तीवेतन (Fixed Pension) साठी नवीन निवृत्तीवेतन योजना (New Pension Scheme) आणण्याच्या तयारीत आहे. नवीन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाची निश्चित रक्कम निवडण्याचा पर्याय मिळेल. यामध्ये नोकरदार वर्गासोबतच स्वयं-रोजगारित व्यक्ती देखील नोंदणी करू शकेल. निवृत्तीवेतनासाठी वेतनातून निश्चित स्वरुपाची रक्कम दर महिन्याला कपात केली जाते. निवृत्ती वेतनासाठीची रक्कम वेतन आणि उर्वरित नोकरीच्या कालावधीच्या आधारावर ठरवली जाते. सध्या ईपीएस मध्ये केवळ वेतनधारी वर्गासाठी नोंदणीचा पर्याय आहे. नवीन सुधारित नियम प्रत्यक्षात आल्यास स्वयं-रोजगारित व्यक्ती स्वत:ची नोंदणी करू शकतात.