AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या वयात सुरु केली PPF गुंतवणूक,तर निवृत्तीपर्यंत 2.5 कोटींचा तगडा फंड

PPF शेअर बाजारासारखी चढ-उताराची गुंतवणूक नाही. यात मार्केट रिस्क नसते आणि पैसा सुरक्षित राहातो. मात्र, इक्विटी SIP दीर्घकाळात जास्त रिटर्न देऊ शकते, परंतू पीपीएफ स्थिर आणि गॅरंटीड रिटर्न देते. त्याचमुळे याला रिटायरमेंट प्लानिंगसाठी एक मजबूत आणि सुरक्षित पर्याय मानला जातो.

या वयात सुरु केली PPF गुंतवणूक,तर निवृत्तीपर्यंत 2.5 कोटींचा तगडा फंड
PPF
| Updated on: May 15, 2026 | 10:45 PM
Share

जर तुम्ही २५ वर्षांचे असाल तर दरवर्षी पब्लिक प्रोव्हीडंट फंडात ( PPF ) १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करणे सुरु केले तर व्याजाच्या ताकदीमुळे तुमचे पैसे दीर्घकाळात वेगाने वाढत जातील. नियमित गुंतवणूक आणि दीर्घ अवधीमुळे जास्त जोखीम न घेता मोठा टॅक्स फ्री फंड तयार केला जाऊ शकतो. परंतू तुम्ही जर सतत गुंतवणूक कराल तर ४०,५० आणि ६० व्या वयापर्यंत किती पैसे जमा होऊ शकतात ? चला सोप्या भाषेत समजून घेऊयात..

PPF मध्ये किती मिळते व्याज ?

सध्या PPF वर वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळते, जे दरवर्षी कंपाऊंड होते. सरकार दर तिमाही याचा आढावा घेते. पीपीएफ अकाऊंचा लॉक-इन पीरियड १५ वर्षांचा असतो, परंतू मॅच्युरिटीनंतर याला ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये पुढे वाढवता येते. एका आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

२५ ते ६० वर्षांपर्यंत गुंतवणूक

जर एखाद्या व्यक्ती २५ व्या वयापासून ते ६० वयापर्यंत दरवर्षी १.५ लाख रुपये पीपीएफमध्ये गुंतवणूक करेल तर सध्या ७.१ टक्के व्याजदराच्या हिशेबने सुमारे २.२६ कोटी रुपयांचा टॅक्स-फ्री फंड तयार होऊ शकतो.

४० व्या वयापर्यंत किती पैसे मिळतील ?

जर तुम्ही १५ वर्षे सतत गुंतवणूक कराल तर

एकूण गुंतवणूक : २२.५ लाख रुपये

अंदाजे व्याज : १८.१८ लाख रुपये

एकूण फंड : ४०.६८ लाख रुपये

५० व्या वयापर्यंत किती पैसे मिळतील ?

२५ व्या वयापर्यंत सलग गुंतवणूक जारी केल्यास

एकूण गुंतवणूक : ३७.५ लाख रुपये

अंदाजित व्याज : ६५.५८ लाख रुपये

एकूण फंड: १.०३ कोटी रुपये

६० व्या वयापर्यंत किती पैसे मिळतील ?

३५ व्या वयापर्यंत सलग गुंतवणूक जारी केल्यास

एकूण गुंतवणूक : ५२.५ लाख रुपये

अंदाजित व्याज : १.७४ कोटी रुपये

एकूण फंड: २.२६ कोटी रुपये

आता देखील PPF मध्ये गुंतवणूक करणे योग्य ?

RBI द्वारा व्याजदरात कपात आणि बँकांचे एफडी दर कमी झाल्यानंतर पीपीएफचे ७.१ टक्के रिटर्न आता पहिल्या पेक्षा जास्त आकर्षक वाटत आहे. खास बाब म्हणजे पीपीएफचे व्याज संपूर्ण टॅक्स फ्री असते. ३० टक्के टॅक्स स्लॅब वाल्या व्यक्तीसाठी ७.१ टक्के टॅक्स -फ्री रिटर्न, टॅक्सेबल एफडीवर सुमारे १० टक्के जास्त रिटर्नच्या बरोबर मानले जाते.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...