AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिमाचल प्रदेशात फिरायला जाताय? कैलास पर्वताचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ‘या’ ठिकाणाला द्या भेट

तुम्ही जर हिमाचल प्रदेशात नैसर्गिक सौंदर्य, शांती आणि आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी योग्य ठिकाण शोधत असाल ततर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेखात आपण अशा एका ठिकाणाबद्दल जाणून घेणा आहोत, जिथून तुम्ही कैलास पर्वताचे मनमोहक दृश्य पाहू शकता.

हिमाचल प्रदेशात फिरायला जाताय? कैलास पर्वताचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी 'या' ठिकाणाला द्या भेट
Kailash PImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: May 15, 2026 | 10:43 PM
Share

हिमाचल प्रदेश हे त्यांच्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणांसाठी ओळखले जाते. कारण येथील हवामान हे वर्षभर आल्हाददायक असते. हिमाचलमध्ये पर्यटकांसाठी लोकप्रिय असलेली अनेक ठिकाणं आहेत. पण आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणाहून तुम्हाला कैलास पर्वताचे अद्भुत दृश्यही पाहता येते. हे ठिकाण म्हणजे नैसर्गिक आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाणारे कल्पा गाव.

किन्नौर जिल्ह्यात वसलेले हे छोटेसे डोंगराळ गाव, गावाच्या अवतीभोवती बर्फाच्छादित शिखरे आणि सफरचंदाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे कैलास पर्वताच्या शुभ्र शिखरांवर पडतात, तेव्हा संपूर्ण दृश्य पाहण्यासारखे असते आणि एक मनमोहक अनुभव निर्माण होतो. या लेखात आपण या ठिकाणांबद्दल अधिक जाणून घेऊयात.

कल्पाचे वैशिष्ट्य काय आहे?

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात वसलेले हे छोटेसे डोंगराळ गाव, येथील शांत वातावरण, पाइनची जंगले आणि बर्फाच्छादित शिखरांसाठी प्रसिद्ध आहे. येथून तुम्हाला किन्नर कैलास पर्वतरांगेचे विहंगम दृश्य दिसते. कल्पाचे सर्वात प्रतिष्ठित स्थळ म्हणजे ही पर्वतरांग, जिथे सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी शिखरे सोनेरी आणि गुलाबी रंगात उजळून निघतात, ज्यामुळे एक अप्रतिम दृश्य पाहायला मिळते.

कल्पात कैलास पर्वत कुठे पाहावा?

किन्नर कैलासचे सर्वात सुंदर दृश्य हिमाचल प्रदेशातील कल्पा गावातून दिसते. सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे बर्फाच्छादित शिखरांवर पडतात, तेव्हा संपूर्ण पर्वत सोनेरी रंगात उजळून निघतो. हवामान स्वच्छ असताना, येथून कैलास शिखर स्पष्टपणे दिसते, ज्यामुळे हे ठिकाण पर्यटक आणि फोटोग्राफरसाठी एक उत्तम पर्याय ठरते. याव्यतिरिक्त रोगी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक उत्कृष्ट व्ह्यू-पॉइंट्स आहेत, जिथून दऱ्या, पाइनची जंगले आणि कैलास पर्वतरांगेचे विहंगम दृश्य दिसते. सुसाईड पॉइंटच्या आजूबाजूचा परिसर देखील पर्वत पाहण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी लोकप्रिय आहे.

कल्पा गावात फिरण्याचे आणि जेवणाचा खर्च किती होतो?

कल्पामध्ये हॉटेल्स, होमस्टे आणि गेस्ट हाऊस सहज उपलब्ध आहेत. पारंपरिक लाकडी होमस्टेमध्ये राहणे हा एक अनोखा अनुभव देतो. येथे तुम्ही किन्नौरी राजमा, सिडू, थुकपा, मोमोज, हिमाचली डाळ आणि देशी तुपासोबत पोळ्या, ताजी सफरचंदं आणि सफरचंदाचा रस यांचा आस्वाद घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राहण्याची सोय आणि जेवण खूपच किफायतशीर आहे. राहण्याचा खर्च 800 पासून सुरू होतो, तर 500 ते 600 मध्ये स्थानिक जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.

Follow Us
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....