AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs GT Live Streaming : गुजरात विजयासह प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी सज्ज, केकेआर रोखणार?

Kolkata Knight Riders vs Gujarat Titans IPL 2026 Live Scorecard: गुजरात टायटन्सला प्लेऑफचं तिकीट मिळवणारी पहिली टीम हा बहुमान मिळवण्याची मोठी संधी आहे. मात्र गुजरातसमोर केकेआरचं आव्हान आहे.

KKR vs GT Live Streaming : गुजरात विजयासह प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी सज्ज, केकेआर रोखणार?
KKR vs GT IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 15, 2026 | 10:47 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 60 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. केकेआर विरुद्ध गुजरात दोन्ही संघांची ही या मोसमातील आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. केकेआरचं प्लेऑफमध्ये पोहचणं अवघड आहे. मात्र केकेआरचं प्लेऑफमधील आव्हान कायम आहे. तर गुजरातला सामना जिंकून प्लेऑफचं अधिकृतरित्या तिकीट मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे गुजरात एकूण नववा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरणार की केकेआर गेल्या पराभवाची परतफेड करण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कधी?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना शनिवारी 16 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कुठे?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना इडन गार्डन्स, कोलकातामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओ हॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅच पाहता येईल.

दोन्ही संघांची कामगिरी

गुजरातचा हा 13 वा आणि केकेआरचा 12 वा सामना असणार आहे. गुजरातने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर केकेआरने 11 पैकी 4 सामने जिंकले आहेत. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे.

केकेआर गुजरातला लोळवणार?

गुजरातने केकेआरवर 17 एप्रिलला झालेल्या सामन्यात विजय मिळवला होता. गुजरातने केकेआरवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे केकेआर या पराभवाची परतफेड करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दौघांपैकी वरचढ कोण?

दरम्यान कोलकाता विरुद्ध गुजरात यांच्यात एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. गुजरातने या 6 पैकी सर्वाधिक 4 सामने जिंकले आहेत. तर केकेआरला फक्त एकमेव जिंकता आला आहे. त्यामुळे आता उभयसंघातील सातव्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो? यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! मृतदेहाच्या प्रायव्हेटपार्टवरील विधान भोवलं... डॉक्टरवर
मोठी बातमी! मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील विधान भोवलं... डॉ. सेजल पवारवर मोठी कारवाई; थेट...
पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
Pune | ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली मोठा घोटाळा? पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम, महत्त्वाच्या बैठकीला बड्या नेत्यांची दांडी
हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल
Harshwardhan Sapkal | हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल- सूत्रांची माहिती
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23...
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?