शेअर बाजारात घसरण ; गुंतवणूकदारांनी काय करावं ? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

शेअर बाजारात घसरण ; गुंतवणूकदारांनी काय करावं ? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात पडझड पहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी निचांकी पातळीवर पोहोचले असून, गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

अजय देशपांडे

|

May 14, 2022 | 5:30 AM

मुंबई : वाढती महागाई (Inflation) रोखण्यासाठी आरबीआयनं (RBI) कर्ज महाग केलंय. कर्ज फक्त भारतातच महाग झालं नाही. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियासह जगभरात महागाईचा सामना करण्यासाठी हीच पद्धत वापरली जाते. महागाई हा आता जागतिक प्रश्न आहे. बाजारातून थेट रोकड कमी करण्यामुळे महागाईवर किती प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल हे येत्या काही दिवसांतच दिसून येईल, मात्र, महाग कर्जाचा परिणाम तत्काळ शेअर बाजारावर (stock market) दिसून येत आहे. आरबीआयनं व्याज दरात वाढ केलेल्या आठवड्यात नोव्हेंबर महिन्यानंतर सर्वाधिक नुकसान झालं आहे. गेल्या एका महिन्यात निफ्टी आणि सेन्सेक्स 12 टक्क्यांनी कोसळला आहे. निफ्टी सध्या 16200 च्या जवळपास आहे, म्हणजेच डीएमए 16800 पेक्षा खालच्या स्तरावर आहे. निफ्टीमधील 75 टक्के शेअर 200 डीएमएच्या खाली ट्रेड करत आहेत. ही पडझड फक्त निफ्टी पुरतीच मर्यादित नाही. गेल्या एका महिन्यात बँक निफ्टी, मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या इंडेक्समध्येही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या इंडेक्समध्ये गेल्या महिनाभरात सुमारे 8 टक्के घसरण झाली आहे. तर बँक निफ्टी 12 टक्के खाली आलाय. बँक निफ्टीमधील मामुली शेअर्स 2021 च्या उच्च स्तरापासून 24 ते 88 टक्के खाली आले आहेत.

बाजारावर विक्रीचा दबाव

आरबीआयनं व्याज दरात वाढ केल्यानंतर बँकिंग, एनबीएफसी, ऑटो, रिअल्टी सारख्या क्षेत्रांचा हिरमोड झालाय. आरबीआय व्याजदरात वाढ करणार याची सगळ्यांनाच माहिती होती मात्र, एवढ्या अचानक वाढ अपेक्षित नव्हती. अशाप्रकारे अचानाक दरवाढ केल्यामुळे बँकिंग, एनबीएफसी, ऑटोमोबाईल आणि रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रांचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज आहे. मागणी वाढल्यामुळे महागाई वाढली नाही तर पुरवठा खंडित झाल्यामुळे महागाईत वाढ झालीये. त्यामुळे आरबीआयचे धोरण प्रभावी ठरण्याची शक्यता कमीच आहे, असं मत ट्रेडिंगोचे संस्थापक पार्थ नयती यांनी व्यक्त केले आहे. शेअर बाजारातील या पडझडीत परदेशी गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. कर्ज महाग झाल्यानं त्यांच्या देशातही भांडवल उभारणं महाग झालंय. एप्रिल महिन्यात भांडवली परकीय गुंतणुकदारांनी 17144 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केलीय. मे महिन्यातील पहिल्या चार दिवसांत परदेशी गुंतवणूकदरांनी 6417 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केलीये. तर दुसरीकडे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी गेल्या 14 महिन्यात खरेदी सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 29869 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केलीय. मे महिन्यातील चार दिवसात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणुकदारांनी 8533 कोटी रुपयांची खरेदी केलीये.

हे सुद्धा वाचा

परदेशी गुंतवणूक वाढीचा अंदाज

बाजाराच्या भाषोत बोलायचं झाल्यास निफ्टी, सेन्सेक्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. बाजार पडल्याचं तज्ज्ञही मानतात. चांगल्या मूल्यांकनामुळे परदेशी गुंतवणूकदार परतू शकतात, असं जियोजित फायनांशियल सर्विसचे प्रमुख गुंतवणूकदार वीके विजयकुमार म्हणतात. निफ्टी पाच टक्क्यानं खाली आल्यास परदेशी गुंतवणूकदार विक्रेत्यांऐवजी खरेदीदार होतील. महाग कर्ज, चीनमधील लॉकडाऊन आणि रशिया- युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात तेजीची शक्यता कमीच असल्याचंही विजयकुमार यांनी म्हटले आहे. तेजीच्या वेळी शेअर्स विक्री करण्याचा सल्ला व्यापारी देत आहे. हा सल्ला निफ्टी 200 डीएमएच्या वर जाईपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें