Share विकल्या विकल्या, पैसा खात्यात जमा; T+0 ची होणार सुरु सेवा

Share Market Settlement | भारतीय शेअर बाजार अधिकाधिक पारदर्शक होत आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. पूर्वी शेअर विक्री केल्यावर तीन ते चार दिवसांनी खात्यात रक्कम येत होती. आता एका दिवसांत ही रक्कम येते. आता त्यापुढील पाऊल टाकण्यात येत आहे.

Share विकल्या विकल्या, पैसा खात्यात जमा; T+0 ची होणार सुरु सेवा
शेअर बाजारात झटपट खात्यात येईल पैसा
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 2:07 PM

नवी दिल्ली | 12 March 2024 : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. शेअर बाजारातील व्यवहार पारदर्शक करण्यासाठी, झटपट पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येत आहे. पूर्वी शेअर विक्री केला. ट्रेड पूर्ण झाला तर खात्यात रक्कम जमा होण्यासाठी तीन ते चार दिवस लागत. त्यानंतर दोन दिवस आणि आता एका दिवसात रक्कम खात्यात येते. आता त्यापुढे पाऊल टाकण्यात येत आहे. शेअर विकला की लागलीच तुमच्या खात्यात रक्कम (T+0 Settlement) जमा होणार आहे. बाजार नियंत्रक SEBI ने मार्च महिन्यापासून T+0 ही व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या T+1 व्यवस्था

सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, शेअरच्या खरेदी-विक्रीचा झटपट व्यवहार होईल. ही व्यवस्था मार्च 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. सध्या देशात भारतीय शेअर बाजारात T+1 व्यवस्था लागू आहे. जगातील अनेक देशात सध्या T+2 अशी व्यवस्था आहे. T+0 ही व्यवस्था लागू झाल्यानंतर भारत हा चीननंतर अशी व्यवस्था देणारा जगातील दुसरा देश असेल. येत्या 28 मार्चपासून कॅश सेगमेंटमध्ये खात्यात झटपट पैसा जमा होईल.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांकडे दोन पर्याय

  1. मार्केट नियंत्रक सेबीने याविषयीची माहिती यापूर्वीच दिली आहे. त्यानुसार, T+0 लागू केल्यास सेटलमेंट करताना लिक्विडीटीची अडचण येणार नाही. गुंतवणूकदाराकडे T+1 ऐवजी T+0 आणि झटपट सेटलमेंटचा पर्याय असेल. T+0 दुपारी 1:30 वाजेपर्यंत व्यापारासाठी मदत करेल. यामध्ये शेअरचा पैसा संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.
  2. दुसऱ्या टप्प्यात गुंतवणूकदारांना 3:30 वाजेपर्यंतच्या सर्व व्यवहारासाठी पर्यायी झटपट सेटलमेंटचा पर्याय मिळेल. ट्रेडर्स, गुंतवणूकदार अशा पर्यायाद्वारे सहज ट्रेडिंग करतील. त्यामुळे खात्यात रक्कम जमा होण्यासाठी त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.
  3. सेबीचे म्युच्युअल फंडावर बारकाईने नजर ठेवत आहे. त्यासाठी जवळपास 80 एल्गोरिदमचा वापर करण्यात येत आहे. फंड हाऊसने गडबडी केल्यास त्यासंबंधीचा अहवाल लागलीच तयार करण्यात येत आहे. आता AI ची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असेल तर ते समोर येणार आहे.
Non Stop LIVE Update
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.