केवळ 250 रुपयात सुरु करा पोस्टात खाते, काही वर्षांनी मिळतील 66 लाख, नेमकी योजना काय?

बहुतेक लोक गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी, तसेच योग्य परतावा मिळावा, यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवणूक करतात. (Sukanya Samriddhi Yojana All details)

केवळ 250 रुपयात सुरु करा पोस्टात खाते, काही वर्षांनी मिळतील 66 लाख, नेमकी योजना काय?
लॉकडाऊनमध्ये पैशांची गरज असेल तर ऑनलाईन बंद करा एफडी; 2 मिनिटांत ट्रान्सफर करा पैसे
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 2:53 PM

मुंबई : बहुतेक लोक गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी, तसेच योग्य परतावा मिळावा, यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिस किंवा बँकाद्वारे बऱ्याच योजना राबवल्या जातात. ज्यात तुम्ही गुंतवणूक करुन तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. यातील एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. ही योजना आपण पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. (Sukanya Samriddhi Yojana All details)

या योजनेत तुम्हाला 7.60 टक्के व्याज मिळतो. विशेष म्हणजे या योजनेत आपण कमीत कमी 250 रुपये रक्कम गुंतवू शकता. एवढ्या कमी किंमतीत मिळणाऱ्या योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेत जर तुम्ही 15 वर्षांसाठी 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 21 वर्षानंतर 66 लाख रुपये मिळतील. ही योजना खास मुलींसाठी आहे. यात मुलीच्या नावावर एकच खाते उघडता येणार आहे. तसेच यात तुम्हाला 80 सी अंतर्गत करात सूट मिळते. हे सर्व फायदे पाहता यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

1) सरकारकडून हमी

या योजनेत फक्त सरकारकडून पैशाची हमी दिली जाते. म्हणजेच आपण केलेली गुंतवणूक ही सरकारकडून सुरक्षित झालेली आहे. त्यामुळे ते बुडण्याची शक्यता कमी आहे. तसेच या योजनेतील व्याजदर हा दरवेळी बदलत जातो. त्यानुसार ते ठेवीच्या रकमेवर परत मिळतो. हे खाते चालू ठेवण्यासाठी गुंतवणूकदाराला दरवर्षी  तुम्हाला किमान 250 रुपये जमा करावे लागतात.

2) एका घरात किती अकाऊंट?

या योजनेत हे खाते केवळ एका मुलीच्या नावावर उघडले जाऊ शकते. तसेच जर कुटुंबात दोन मुली असतील तर दोन खाती उघडता येतील. पण त्यापेक्षा जास्त नाही. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या मुलीचे खाते उघडायचे आहे त्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त नसावे. हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत उघडता येते.

3) शिल्लक रक्कम तपासण्याचे दोन मार्ग

सुकन्या समृद्धी खात्यात शिल्लक रक्कम तपासण्याचे दोन मार्ग आहेत. ऑफलाईन मोड आणि ऑनलाईन मोड. जर आपण पोस्ट ऑफिसद्वारे खाते उघडले असेल तर आपल्याला ऑफलाईनद्वारे शिल्लक तपासावी लागेल. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पासबुक अपडेट करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला शिल्लक रकमेची माहिती मिळेल. त्याचबरोबर ऑनलाईन शिल्लक तपासण्यासाठी तुम्हाला नेट बँकिंगद्वारेही ते मिळू शकेल. यासाठी तुम्हाला नेटबँकिंगमध्ये लॉगिन करावे लागेल, जिथे तुम्हाला या खात्यातील शिल्लक दिसू शकेल.

4) पैसे कधी मिळणार?

तुमची मुलगी 24 ते 30 वर्षांची होतपर्यंत सुकन्या समृद्धी योजना मॅच्यॉर होऊन जाते. त्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याजही मिळेत राहील. सुकन्या समृद्धी योजना खात्यातून 18 वर्षांनंतर मुलीच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी 50 टक्के रक्कम काढता येते. तर मॅच्यॉरीटीवर व्याजसह पूर्ण रक्कम मिळते. मुलीच्या लग्नावेळी हे पैसे खूप कामात येतात. त्यामुळे पालकांवर बोजा येत नाही.

5) किती वर्षांसाठी गुंतवणूक

हे खाते 21 वर्षांसाठी असते. तसेच जेव्हा मुलगी लग्न करण्यास पात्र असते, तेव्हा तिला मॅच्युरिटीचे पैसे मिळतात. हे खाते 21 वर्षांसाठी असले तरी त्यात गुंतवणूक फक्त 15 वर्षांसाठी करावी लागेल. म्हणजे जर तुम्ही तुमची मुलगी चार वर्षाची असताना हे अकाऊंट सुरु केले तर ते 25 वर्षापर्यंत मॅच्युर होते. विशेष म्हणजे मुलीच्या लग्नासाठी तुम्ही यातून पैसे काढू शकता.

6) खातं उघडण्याचे नियम

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे आई-वडील कायदेशीर पालक म्हणून मुलीच्या नावाने खातं उघडू शकतात. यामध्ये एका मुलीसाठी एकच खातं उघडता येतं. तर जास्तीत जास्त दोन मुलींसाठी तुम्ही खातं उघडू शकता. पोस्ट ऑफीस किंवा बँकेत खातं उघडते वेळी मुलीचा जन्माचा दाखला, त्यासोबत आई-वडिलांचा किंवा अधिकृत पालकांचे ओळखपत्र आणि घराच्या पत्त्याचा पुरावा देणं गरजेचं असतं. (Sukanya Samriddhi Yojana All details)

संबंधित बातम्या : 

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, 10 वर्षानंतर मिळतील 16 लाख रुपये

क्रेडिट कार्डचे बिल चुकतं न केल्यास काय होणार? घाबरु नका, तुमचे अधिकार जाणून घ्या

Post office RD : पोस्टाची भन्नाट योजना, 990 रुपयांची गुंतवणूक करा आणि 69,002 रुपये मिळवा

Non Stop LIVE Update
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.
लोकलने प्रवास करताय? ही बातमी वाचा! 'मरे'वर 36 तासांचा ब्लॉक, पण कुठे?
लोकलने प्रवास करताय? ही बातमी वाचा! 'मरे'वर 36 तासांचा ब्लॉक, पण कुठे?.
आला रे Monsoon केरळात आला, राज्यात 'या' दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री
आला रे Monsoon केरळात आला, राज्यात 'या' दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री.
दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सूरज चव्हाणांच्या टीकेनंतर उडाला भडका
दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सूरज चव्हाणांच्या टीकेनंतर उडाला भडका.
आव्हाडांना अटक होणार? 'त्या' कृतीवरून संताप, कुणी केली अटकेची मागणी?
आव्हाडांना अटक होणार? 'त्या' कृतीवरून संताप, कुणी केली अटकेची मागणी?.
Baramati : क्या बोलती पब्लिक? बारामतीकरांच्या मनात कोण? ताई की वहिनी?
Baramati : क्या बोलती पब्लिक? बारामतीकरांच्या मनात कोण? ताई की वहिनी?.
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?.
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा...
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा....
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा..
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा...
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.