AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pension Update : आजी खूर्ची टेकत टेकत बँकेत पोहोचली, पण दिल्ली हादरली आणि पुढे जे काही झालं पाहा

Pension Update : पेन्शन मिळण्यासाठी ओडिशातील एका 70 वर्षीय आजीबाईला मोठी कसरत करावी लागली. बँकिंग सुविधांचा किती बोजवारा उडालेला आहे, हे यानिमित्ताने पुढे आले. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतल्यानंतर हा चमत्कार झाला.

Pension Update : आजी खूर्ची टेकत टेकत बँकेत पोहोचली, पण दिल्ली हादरली आणि पुढे जे काही झालं पाहा
| Updated on: Apr 22, 2023 | 8:04 AM
Share

नवी दिल्ली : ओडिशा राज्यातील (Odisha) झारीगाव येथील सूर्या हरिजन (Surya Harijan) या 70 वर्षीय आजीबाई, त्यांना पेन्शन मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. खुर्चीची मदत घेऊन त्या बँकेकडे पायी चालल्या होत्या. बँकांना वयोवृद्धांना घरपोच सेवा देण्याचे निर्देश असताना, बँकांच्या मनमानी कारभाराचा कसा फटका बसतो, हे पुन्हा एकदा दिसून आले. बँकिंग सेवा ऑनलाईन झाल्याची आपण दवंडी पिटवत असलो तरी या आजीबाईच्या व्हायरल व्हिडिओने अनेकांच्या काळजात धस्स झालं. या प्रकाराची गंभीर दखल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी घेतली. त्यानंतर यंत्रणा जागच्या हलल्या आणि चमत्कार झाला.

व्यक्त केली नाराजी वृत्तसंस्था एएनआयने या आजीबाईचा हा व्हिडिओ ट्विट केला होता. याप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घेतली. त्यांनी प्रशासनाला या आजाबाईकडे मानवीय दृष्टीकोन ठेऊन सुविधा देण्याचे आवाहन केले. त्यांनी तात्काळ स्टेट बँक ऑफ इंडियाकडे याविषयीची चौकशी केली. तसेच या वृद्ध महिलेला मदत करण्यासाठी एखादा बँक मित्र नाही का असा सवाल विचारला.

बँकेने केली व्यवस्था AIN ने दाखविलेल्या व्हिडिओनंतर निर्मला सीतारमण यांनी बँकेला फैलावर घेतले. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेने विश्वास दिला की, या आजीबाईला तिच्या घरी पेन्शनची रक्कम देण्यात येईल. एवढेच नाही तर झारीगावाच्या जवळ असलेल्या एसबीआयच्या शाखेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने वृद्ध महिलेच्या घरी तिला पेन्शनची रक्कम पोहचवली. एवढेच नाही तर या महिलेला आता प्रशासनाने व्हीलचेअर सुद्धा दिली आहे.

काय होती अडचण या भागातील एसबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की पेन्शनधारक सूर्या हरिजन या अगोदर गावातीलच CSP केंद्रातून पेन्शनची रक्कम घेत होत्या. पण वाढत्या वयामुळे त्यांच्या हाताचे ठसे उमटत नव्हते. त्यानंतर त्या नातेवाईकांच्या मदतीने बँकेच्या शाखेत येत होत्या. त्यानंतर त्यांना पेन्शन मिळत होती.

एसबीआय घेणार काळजी अर्थात वयोवृद्धांना घरपोच बँकिंग सुविधा देण्याचा निर्णय यापूर्वीच बँकांनी घेतला आहे. त्यासाठी बँक मित्रांची नियुक्ती पण करण्यात आली आहे. पण अनेक ठिकाणी नियोजनाच्या अभावामुळे अशा मोठ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. बँकेने केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ट्विटला तातडीने उत्तर दिले. तसेच सूर्या हरिजन यांना पेन्शनची रक्कम देऊन व्हीलचेअर दिल्याचे सांगितले. तसेच यापुढे देशात असे प्रकार घडू नयेत यासाठी तातडीने उपाय योजना करण्यात येणार असून त्यासाठी आयरिस स्कॅनरचा पर्याय वापरण्याविषयी विचार करण्यात येत असल्याचे बँकेने स्पष्ट केले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.