AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेक भरताना ‘या’ चुका कधीही करु नका, बँक खाते होऊ शकते रिकामे

संभाव्य धोक्यांना समोर ठेवून पंजाब नॅशनल बँकेने चेकद्वारे व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी काही निर्देश दिले आहेत. (check payment and banking)

चेक भरताना 'या' चुका कधीही करु नका, बँक खाते होऊ शकते रिकामे
3 बँकांचे चेकबुक निरुपयोगी होणार : 1 ऑक्टोबरपासून 3 बँकांचे चेकबुक आणि MICR कोड अवैध ठरतील. या बँका अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया आहेत. या 3 बँकांच्या ग्राहकांना 30 सप्टेंबरपूर्वी नवीन चेकबुक जारी करण्यास सांगितले होते.
| Updated on: Feb 16, 2021 | 2:47 PM
Share

मुंबई : आजकाल सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चोरटे रोज नवनवीन क्लृप्त्या शेधून अनेकांना लाखोंचा गंडा घालत आहेत. ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे ऑनलाईन पद्धातीने लोकांची होणारी लूटमाज आजकाल गंभीर विषय झाला आहे. चेकच्या माध्यमतून पैशांचे व्यवहार करतानासुद्धा अनेक प्रकारे धोका होऊ शकतो. तशी काही उदाहरणंही होऊन गेली आहेत. या संभाव्य धोक्यांना समोर ठेवून पंजाब नॅशनल बँकेने चेकद्वारे व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी काही निर्देश दिले आहेत. (Tips for secure check payment and banking)

पंजाब नॅशनल बँकेने  (PNB) सांगितले आहे की, कोणालाही चेकद्वारे पैसे देताना विशेष गोष्टींची काळजी घ्या. सर्वप्रथम चेक भरताना पर्मनंट पेनचा वापर करावा. जेल पेन, पेन्सिल किंवा स्केच पेनचा वापर करु नये. तसेच चेक भरुन झाल्यानंतर चेक टाकताना ड्रॉपबॉक्स तपासून बघावा. जुने चेक नष्ट करण्याचा सल्लाही पंजाब नॅशनल बँकेने दिला आहे.

चेकद्वारे व्यवहार करताना खालील बाबींची काळजी घ्या

> चेक भरताना पर्मनंट पेनचा वापर करावा

> चेक ड्रॉप करताना ड्रॉपबॉक्स चेक करुन पाहा

> चेकवर ओव्हर रायटिंग करु नका. तसचे चेकवर खोडखाड करणे टाळावे

> न वापरेले जुने चेक नष्ट करा

> चेकवर शक्यतो कोणतीही जागा रिकामी टेवू नका

या गोष्टींची काळजी घेतल्यानंतर आपल्याला चेकच्या माध्य़मातून संभाव्य लुटीचे प्रकार टाळता येऊ शकतात.

चेकबुक कसे सुरक्षित ठेवावे?

चेकबुक भरताना काय काळजी घ्यावी यासाठी पंजाब नॅशनल बँकेने सूचना सांगितल्या आहेत. मात्र, कधीकधी चेकबुक गहाळ झाल्यामुळेसुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. हरवलेल्या चेकबुकद्वारे आपल्या बँकेतील रक्कम फस्त केली जाऊ शकते. त्यामुळे चेकबुक ठेवताना किती चेक दिले याची कायम नोंद ठेवावी. चेकबुकला कोठेही सोडून देऊ नये. चेकबुकला नेहमी सुरक्षित अशा ठिकाणी ठेवावे तसेच प्रत्येक चेकला मोजून ठेवले तर कधीही उत्तमच.

इतर बातम्या :

Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर

Alert! 31 मार्च करा ‘हे’ महत्त्वाचं काम, अन्यथा खात्यातून पैसे नाही निघणार

बंपर ऑफर! Jio चे चार असे प्लॅन ज्यामध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि 4G इंटरनेट डेटा

(Tips for secure check payment and banking)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.