AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिस्काऊंटसोबत खरेदी करा स्वस्त सोनं, आजपासून सुरू होतेय सरकारी योजना

नॉन-फिजिकल सोन्यात गोल्ड बाँडची गुंतवणूक करणं एक चांगला पर्याय आहे. जर गोल्ड बाँडमधील गुंतवणूकदार मॅच्यूअरिटीपर्यंत राहिला तर याचे बरेच फायदे मिळतात.

डिस्काऊंटसोबत खरेदी करा स्वस्त सोनं, आजपासून सुरू होतेय सरकारी योजना
| Edited By: | Updated on: Oct 12, 2020 | 9:16 AM
Share

नवी दिल्ली : आजपासून सार्वभौम सुवर्ण रोखे (Soverign Gold Bond) मध्ये सबस्क्रिप्शनची संधी सुरू होत आहे. केंद्र सरकारकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोन्याच्या सबस्क्रिप्शनची किंमत प्रति ग्रॅम 5,051 रुपये निश्चित केली आहे. त्यामुळे ऑनलाईन गोल्ड बाँड घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी याचा भाव 5,001 रुपये प्रति ग्रॅम असणार आहे. गोल्ड बाँड योजना 2020-21 च्या सीरिजची ही सातवी (Sovereign Gold Bond Scheme 2020-21-Series VII) योजना आहे. गुंतवणूकदारांना आजपासून ते 16 ऑक्टोबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. (today gold bond scheme 2020 21 subscription starts know its benefit)

गोल्ड बाँडची मॅच्यूअरिटी कालावधी 8 वर्षांची असते. खरंतर, गुंतवणुकीच्या 5 वर्षानंतर यामधून बाहेर पडता येऊ शकतं. मॅच्यूअरिटीवर मिळणाऱ्या सोन्याची किंमत सध्याच्या किंमतीवर आधारित आहे. जर तुम्हीही गुंतवणूक करण्यासाठी इच्छित असाल तर तुम्हाला या गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे.

1. ऑगस्ट महिन्यात मोठ्या पातळीवर सोन्याचे भाव घसरल्यानंतर या योजनेत तोटा होण्याचा धोका आहे. 10 ग्रॅम सोन्याच्या भावावर वायदा बाजारात किमान 56,200 रुपये आहेत.

2. RBI ने गोल्ड बाँडच्या अंतर्गत सोन्याचे भाव इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे निश्चित केला आहे. यात शुद्ध सोन्यासाठी 999 रुपये आहेत.

3. गोल्ड बाँडला भारतीय रिझर्व्ह बँक जारी करते. याला केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात येतं.

4. गोल्ड बाँड योजनेला नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. देशातील फिजिकल सोन्याची मागणी कमी करण्यासाठी आणि लोक सोन्याद्वारे देशांतर्गत व आर्थिक बचतीची बचत करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. (today gold bond scheme 2020 21 subscription starts know its benefit)

5. या योजनेंतर्गत किमान 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक केली जाऊ शकते.

6. गोल्ड बाँड योजनेचा लाभ घेण्यासाठी स्मॉल फायनान्स बँक किंवा पेमेंट बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि एनएसई आणि बीएसई मार्फत गुंतवणूक करता येते.

7. नॉन-फिजिकल सोन्यात गोल्ड बाँडची गुंतवणूक करणं एक चांगला पर्याय आहे. जर गोल्ड बाँडमधील गुंतवणूकदार मॅच्यूअरिटीपर्यंत राहिला तर याचे बरेच फायदे मिळतात.

8. गोल्ड बाँडवर वर्षाला 2.50 टक्के व्याजदर मिळतं.

9. गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याला ठेवण्यासाठी जागा शोधण्याची गरज नाही. यावर कोणताही जीएसटी द्यावा लागत नाही.

10. जर गोल्ड बाँडच्या मॅच्यूअरिटीवर भांडवल नफा झाला तर चांगली सूट मिळते. सोन्याच्या बाँडवरील हा एक मोठा फायदा आहे.

संबंधित बातम्या –

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 5 आणि 10 रुपयांची नाणी विका, लखपती व्हा

Flipkart आणि Amazon सगळ्यात मोठा सेल, ‘या’ फोनवर मिळणार 10 हजारांपर्यंत डिस्काऊंट

(today gold bond scheme 2020 21 subscription starts know its benefit)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.