AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate : सलग चौथ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ कायम, सेन्सेक्सलाही उसळी

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती वाढल्याचं पाहायला मिळालं.

Todays Gold Rate : सलग चौथ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ कायम, सेन्सेक्सलाही उसळी
| Edited By: | Updated on: Jan 21, 2021 | 11:01 AM
Share

मुंबई : Gold price today 21 January 2021: जागतिक बाजारात सेन्सेक्सनं उसळी मारल्यानंतर आता सोन्याचे भावही वधारल्याचं दिसून आलं. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती वाढल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत 22 कॅरेट सोन्यामध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48,110 वर पोहोचला तर काल हा भाव 48,100 वर होता. चांदीबद्दल बोलायचं झाल्यास आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 671 वर पोहोचली असून कालचा भाव 665 रुपये इतका होता. आज अमेरिकेत होणाऱ्या हालचालींमुळे सोन्या-चांदीच्या भावांमध्येही वाढ झाल्याचं समोर आलं आहे. (todays gold rate silver rate hike because of america joe biden know here today’s rate of gold and silver)

सेन्सेक्सलाही उसळी

गुरुवारी जागतिक बाजारपेठेत जोरदार शेअर बाजार सुरू झाला. जो बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती बनल्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत जोरदार तेजी पाहायला मिळाली. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेबरोबरच देशांतर्गत बाजारावरही झाला. यावेळी सेन्सेक्स (Sensex) पहिल्यांदाच 50,000 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 14,700 च्या पुढे गेली.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ट्रेझरी सेक्रेटरी म्हणून जेनेट येलेन यांचं नाव निर्देशित केल्यानं परदेशी बाजारपेठ तसेच भारतीय बाजारपेठेतील सोन्याची चमक वाढली. अशात आज बायडन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यामुळे मार्केट आणखी वाढलं आहे. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारी वायदा व्यापार 0.43 टक्क्यांवर होताना दिसला. MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,195 रुपयांवर होती. तर चांदीमध्ये मार्च फ्युचर्सच्या व्यापारात 0.66 टक्क्यांची वाढ झाली असून, ती प्रति किलो 66.472 रुपयांवर व्यापार करताना दिसली.

अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. परदेशी बाजारात स्पॉट सोन्याचे दर 0.5 टक्क्यांनी वाढून 1848 डॉलर प्रति औंसवर गेले होते, तर चांदीमध्ये 0.9 टक्क्यांनी वाढ झाली होती. अशी अपेक्षा आहे की येत्या काही दिवसांत सोन्याची चमक कायम राहील.

महत्त्वाच्या शहरांमधील सोन्याचे भाव

सोन्याचा भावा              आज                   काल

नागपूर                         48110                   48100

पुणे                              48110                   48100

नाशिक                        48110                   48100

नवी दिल्ली                   47920                  47910

हैद्राबाद                       47920                  47910

किंमत का वाढली?

बाजार तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, कोरोना लसीची बातमी प्रथम अमेरिकन प्रोत्साहन पॅकेजच्या बातमीनंतर आणि नवीन अध्यक्षांच्या निवडीनंतर आली. यापूर्वी कोरोना शिखरावर सोन्याने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला. केवळ ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे 8000 रुपयांची वाढ नोंदली गेली. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये चढउतार होऊ शकतात. (todays gold rate silver rate hike because of america joe biden know here today’s rate of gold and silver)

संबंधित बातम्या – 

Gold Silver Price : अमेरिकेतील हालचालीमुळे सोन्याच्या किमती वाढल्या; जाणून घ्या तोळ्याचा भाव

Gold Price : 1 हजार रुपयांनी वाढली सोन्याची किंमत, जाणून घ्या आजचा दर

घरबसल्या 1 रुपयात सोने खरेदी करा; योजनेबद्दल सर्व काही जाणून घ्या

(todays gold rate silver rate hike because of america joe biden know here today’s rate of gold and silver)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.