वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना मोठा झटका, एवढ्या रुपयांनी वाढणार मोबाईल बिल

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनीने त्यांच्या दोन पोस्टपेड योजनांच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:55 PM, 1 Dec 2020
Mobile Number Portability TRAI Rules
व्हॉट्सअ‍ॅपने बऱ्याच वेळा या नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूलची चाचणी केली आहे. काही बीटा वापरकर्ते आधीपासूनच या सुविधेचा लाभ घेत होते.

नवी दिल्ली : वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) कंपनीचं कार्ज असणाऱ्या ग्राहकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण वोडाफोनन-आयडिया कंपनीने त्यांच्या पोस्टपेड योजनांमध्ये शुल्कवाढ केली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनीने त्यांच्या दोन पोस्टपेड योजनांच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता आता किंमत नवीन दरांनुसार लागू होणार आहे. वोडाफोन-आयडियाच्या वेबसाइटनुसार, 598 रुपयांची योजना आता 649 रुपयांना उपलब्ध आहे तर 749 रुपयांच्या योजनेची किंमत आता 799 रुपये करण्यात आली आहे. (vodafone idea customers big news now your phone bill will be so expensive)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही योजना वोडाफोन आयडियाच्या RED कौटुंबिक योजनेचा एक भाग आहेत. वोडाफोन आयडियाने ग्राहकांसाठी खास RED फॅमिली प्लॅनची ​​ऑफर आणली आहे. ज्यामध्ये आता नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

काय आहे RED फॅमिली योजना?

वोडाफोन आयडियाने सध्या ऑफर केलेल्या आठ पोस्टपेड योजनांपैकी फक्त दोनच योजनांमध्ये किंमती वाढण्यात आल्या आहेत. या वाढीचा परिणाम 598 रुपये आणि 749 रुपयांच्या योजनांवर होणार आहे. या दोन्ही योजना RED फॅमिली पोस्टपेड योजनांचा एक भाग आहेत. यामुळे आता नव्या योजनेनुसार किंमती 649 आणि 799 रुपये इतक्या वाढणार आहेत. (vodafone idea customers big news now your phone bill will be so expensive)

649 रुपयांच्या योजनेत प्रत्येक महिन्याला अनलिमिटेड व्हॉईस कॉल, 80 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळणार आहेत. या योजनेत कुटुंबातील 2 सदस्यांचा समावेश होईल. इतकंच नाही तर 799 रुपयांच्या योजनेमध्ये 120 GB पर्यंतचा डेटा उपलब्ध आहे आणि तो तीन कनेक्शनला सपोर्ट करतो.

इतर बातम्या –

मोदी सरकारला मोठा दिलासा, नोव्हेंबरमध्ये तब्बल 1 लाख कोटींहून अधिक GST जमा

Alert! पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असेल तर वेळीच करा ‘हे’ काम, नाहीतर बसेल दंड

(vodafone idea customers big news now your phone bill will be so expensive)