AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI Payment: आता बील भरण्यासाठी फोनची गरज नाही, चष्म्याच्या मदतीने करता येणार पेमेंट

लेन्सकार्टने बी कॅमेरा स्मार्टग्लासेसमध्ये डायरेक्ट यूपीआय पेमेंट्स नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्सना स्मार्टग्लासेसच्या मदतीने क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करता येते. कंपनीने मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये याची माहिती दिली आहे.

UPI Payment: आता बील भरण्यासाठी फोनची गरज नाही, चष्म्याच्या मदतीने करता येणार पेमेंट
lenskart upi payment
| Updated on: Oct 10, 2025 | 6:24 PM
Share

युपीआय पेमेंटमुळे पैसे सोबत ठेवण्याची गरज नाही, कारण मोबाईल फोनद्वारे पेमेंट करता येते. मात्र आता पेमेंट करण्यासाठी मोबाइलचीही गरज नाही. कारण आता चष्म्याच्या मदतीने पेमेंट करता येणार आहे. लेन्सकार्टने बी कॅमेरा स्मार्टग्लासेसमध्ये डायरेक्ट यूपीआय पेमेंट्स नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्सना स्मार्टग्लासेसच्या मदतीने क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करता येते. कंपनीने मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये याची माहिती दिली आहे. पुढील काही महिन्यांत हे चष्मे बाजारात दाखल होणार आहेत.

हे फीचर कसं काम करणार?

यूपीआय इंटिग्रेशन चष्मे बँक खात्याशी जोडलेले असणार आहेत. यामुळे केवळ व्हॉइस कमांडच्या मदतीने पेमेंट पूर्ण करता येते. हे असे फीचर आहे, ज्याद्वारे पेमेंट करताना फोन वापरण्याची किंवा पिन कोड टाकण्याची आवश्यकता नाही. कंपनीने म्हटले आहे की, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) चे यूपीआय सर्कल फीचर चष्म्यांना थेट व्यक्तीच्या बँक खात्याशी जोडते. ज्याद्वारे पेमेंट करता येते.

पीयूष बन्सल काय म्हणाले?

या फीचरबाबत बोलताना लेन्सकार्टचे अध्यक्ष, सीईओ आणि सह-संस्थापक पीयूष बन्सल म्हणाले की, ‘स्मार्ट चष्म्यांचा वापर आपल्या जीवन सुरळीत करतील. पेमेंट्स आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. स्मार्ट चष्म्याच्या कॅमेऱ्याद्वारे पेमेंट्सची सुविधा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. अॅडव्हांस ऑन-द-गो पॉइंट-ऑफ-व्ह्यू (पीओव्ही) कॅमेरा आणि बिल्ट-इन एआय फीचर असलेला बी कॅमेरा स्मार्टग्लासेसमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे.’ कंपनीच्या या निर्णयामुळे युपीआय पेमेंटमध्ये नवी क्रांती होणार आहे.

चष्म्याचा व्यवसाय कसा आहे ?

2022 पासून जागतिक स्मार्टग्लास शिपमेंट तिप्पटीपेक्षा जास्त झाले आहे. आयएमएआरसी ग्रुपच्या बाजार संशोधनानुसार, भारतातील एआर आणि व्हीआर चष्म्यांची बाजारपेठ 2024 मध्ये 608 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. गेमिंग, आरोग्यसेवा आणि शिक्षणातील मागणीमुळे 2033 पर्यंत 1.67 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. जागतिक स्मार्ट ग्लासेस बाजारपेठेचे मूल्य $6 अब्ज पेक्षा जास्त आहे, हे 2032 पर्यंत $15.08 अब्ज पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.