8th Pay Commission: कधीपासून लागू होणार 8वा वेतन आयोग? मोठी अपडेट आली समोर
8th Pay Commission Implementation Date: केंद्र सरकारने यावर्षाच्या सुरुवातीला 8 व्या वेतन आयोगाची स्थापन केली आहे. पण अजून लागू करण्याची घोषणा केलेली नाही. नॅशनल मिशन फॉर ओल्ड पेन्शन स्कीम, भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मनजीत सिंह पटेल यांनी याविषयावर मोठी अपडेट दिली आहे.

8th Pay Commission Implementation Date: केंद्रीय कर्मचार्यांमध्ये 8 वा वेतन आयोगाची मोठी चर्चा आहे. केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली आहे. पण अजून तो लागू केलेला नाही. सध्या आयोग प्रत्येक राज्यात जाऊन केंद्रीय कर्मचार्यांच्या संघटनांशी चर्चा करत आहे. अर्थात हा नवीन वेतन आयोग कधीपासून लागू करण्यात येणार याविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल मिशन फॉर ओल्ड पेन्शन स्कीम, भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मनजीत सिंह पटेल यांनी याविषयीची माहिती दिली आहे.
केव्हा लागू होणार 8 वा वेतन आयोग?
डॉ. मनजीत पटेल यांच्या माहितीनुसार 8 वा वेतन आयोगातंर्गत वाढलेला पगार, थकबाकी आणि निवृत्तवेतन लवकरच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यानुसार, एप्रिल 2027 मध्ये ही वेतन, थकबाकी आणि निवृत्ती रक्कम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. डॉ. मनजीत पटेल यांनी याविषयीचे गणित समजावून सांगितले आहे.
केंद्र सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. नोव्हेंबर 2025 मध्ये आयोगासाठी गॅझेटमध्ये अधिसूचना काढण्यात आली. आयोगाला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. नोव्हेंबर 2025 पासून 18 महिन्यांचा कालावधी मोजल्यास एप्रिल -मे 2027 च्या जवळपास वेतन आयोग लागू होऊ शकतो. या कालावधीत कर्मचाऱ्यांना पैसे मिळतील.
8 व्या वेतन आयोगाची नंतरची बैठक कुठे?
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत. त्यांना वेतन आयोगाकडून काय काय हवे आहे याविषयची चर्चा करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत याविषयीची एक बैठक घेण्यात आली होती. आज वेतन आयोगाचे सदस्य हैदराबाद येथे आहेत. तिथे त्यांची बैठक सुरू आहे. त्यानंतर आयोगाची पुढील बैठक 1-4 जूनपर्यंत श्रीनगर येथे होईल. त्यानंतर 8 जून रोजी आयोग लद्दाख येथे जाणार आहे.
1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना थकबाकी
31 डिसेंबर 2025 रोजी 7 व्या वेतन आयोगाची वैधता संपली आहे. अजून 8 व्या वेतन आयोग लागू होण्यास उशीर आहे. नियमानुसार कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 रोजीपासूनच वाढीव वेतन गृहीत धरले जाईल. म्हणजे अंतिम घोषणा होईपर्यंतची वाढीव वेतनाच्या फरकातील थकबाकी जमा होत आहे. ही थकबाकी एकरकमी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
