AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mobile Tower : घरावर मोबाईल टॉवर बसवण्याची उगा घाई कशाला, फसवणा-या टोळ्या राज्यात सक्रीय, दूरसंचार उद्योगाने काय दिला इशारा

Mobile Tower News Alert : घरावर मोबाईल टॉवर उभारताय. पण फसवणुकीचे प्रकार माहिती आहेत का? दूरसंचार विभागाने काय दिला इशारा, का केले सावध, चला जाणून घेऊयात

Mobile Tower : घरावर मोबाईल टॉवर बसवण्याची उगा घाई कशाला, फसवणा-या टोळ्या राज्यात सक्रीय, दूरसंचार उद्योगाने काय दिला इशारा
मोबाईल टॉवर उभारताना सावधानImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 11, 2022 | 2:18 PM
Share

Mobile Tower Scam News : घरावर मोबाईल टॉवर(Mobile Tower) उभारत आहात? तर ही माहिती तुम्ही वाचाच. कारण घरावर मोबाईल टॉवर उभारुन बसल्या ठिकाणी मोठी कमाईची (Benefits) स्वप्न तुम्ही रंगवत असाल तर वेळीच सावध व्हा. कोणीतरी तुम्हालाच सावज करुन कमाईचा प्लॅन अगोदरच आखला आहे. दूरसंचार क्षेत्रात काम करणा-या दोन आघाडीच्या संस्थांनी जनतेला या गोरखधंद्याची माहिती देऊन जागरुक केले आहे. जर तुम्हाला या जाळ्यात अडकायचं नसेल तर आताच सावध व्हा. दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदातांची प्रमुख प्रतिनिधी संस्‍था डीआयपीए (DIPA)आणि सीओएआय(COAI) या दोन संस्थांनी नागरिकांना सावध केले आहे. नागरिकांना त्यांच्या मालमत्तेत मोबाईल टॉवर उभारुन मालामाल करण्याचे आमिष दाखवण्यात येते. त्यासाठी अगोदरच त्यांच्याकडून भलीमोठी रक्कम उकळण्यात येते. या दोन्ही संस्थांनी या फसवणुकीबाबत नागरिकांना अलर्ट (Alert) दिला आहे. मोबाइल टॉवर्स उभारण्‍यासंबंधित होणार्‍या फसवणूकीबाबत सावध केले आहे.

जनतेची फसवणूक करण्‍यासोबत त्‍यांना मोबाइल टॉवर्स बसवण्याकरिता त्यांची जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी सरकारी कराच्या नावावर स्‍वत:च्‍या वैयक्तिक किंवा कंपनीच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगणार्‍या विशिष्‍ट कंपन्‍या, एजन्‍सीज किंवा व्‍यक्‍तींविरुद्ध जनतेला सावध करण्‍यात आले आहे. हेच लोक मोबाइल टॉवर्स बसवण्यासाठी दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देखील देत आहेत.

मोबाइल टॉवर्स टेलिकॉम सर्विस प्रोव्‍हायडर्स (TSP) किंवा इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रोव्‍हायडर्स (IP) द्वारे स्थापित केले जातात. टॉवर स्थापनेसाठी कोणत्याही ऑफर स्वीकारण्यापूर्वी लोकांना टीएसपी किंवा आयपीच्या वेबसाइट्सना भेट देऊन सत्यता पडताळण्याची विनंती करण्‍यात आली आहे. मान्यताप्राप्‍त टीएसपी आणि आयपीची अद्ययावत यादी www.dot.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

डीआयपीएचे डीजी श्री. टी. आर. दुआ म्‍हणाले, ”इंडस टॉवर्स, अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशन, सुमित डिजिटल इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर, असेंड टेलिकॉम, टॉवर व्हिजन अशा टेलिकॉम इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रदातांकडून मोबाइल टॉवर्स स्‍थापित केले जातात. आयपी जनतेला फसवणूकींबाबत सावध करण्‍यासाठी अनेक पावले उचलत आहेत आणि टोल-फ्री क्रमांक, वेबसाइट, ई-मेल इत्‍यादी सारख्‍या विविध माध्‍यमांच्‍या माध्‍यमातून संभाव्‍य ठिकाणांबाबत माहिती गोळा करण्‍यासाठी विविध पद्धती सादर केल्‍या आहेत. याव्‍यतिरिक्‍त एक जबाबदार संस्‍था म्‍हणून डीआयपीए टॉवरच्या फसवणुकीबद्दल जनतेला सावध करण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक सूचना देखील प्रकाशित करत आहे.”

”अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी, विविध महत्त्वपूर्ण सेवांना पाठिंबा देण्यासाठी आणि राज्यांमध्ये दळणवळण राखण्यासाठी मोबाइल टॉवर्स अत्यंत आवश्यक आहेत. मोबाइल टॉवरशी संबंधित फसवणुकीमुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एक मजबूत संप्रेषण नेटवर्क तयार करण्याप्रती प्रत्‍यक्ष काम करणार्‍या टीम कर्मचार्‍यांमध्ये विश्‍वासाची कमतरता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. दूरसंचार उद्योग ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणून, आवश्यक मजबूत पायाभूत सुविधा सादर करण्यासाठी आम्ही डीआयपीएसोबत सहयोग केला आहे. तसेच, ग्राहकांना या फसव्या पद्धतींबद्दल माहिती आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही विविध व्‍यासपीठांवर सूचना जारी करत आहोत,” असे सीओएआयचे डीजी लेफ्टनंट कर्नल डॉ. एस. पी. कोछर म्‍हणाले.

हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.

Follow Us
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर