कोल्ड ड्रिंगच्या बाटलीनं नशीब चमकलं, ChatGPT आणि Grok चा सल्ला ऐकला, अन् 10 दिवसांत पठ्ठ्याचे पैसे झाले डबल
तुमच्या हातात मस्त एक कोल्ड ड्रिंकची बाटली आहे आणि तिचं झाकंण उघडून तुम्ही ड्रिंकचा आनंद घेत आहात. आणि सोबतच ChatGPT आणि AI च्या मदतीनं पैसे देखील कमवत आहात, असं झालं तर? नक्कीच आपल्याला आनंद होईल, असंच एका तरुणासोबत घडलं आहे.

विचार करा तुमची सुट्टी आहे, तुमच्या हातात मस्त एक कोल्ड ड्रिंकची बाटली आहे आणि तिचं झाकंण उघडून तुम्ही ड्रिंकचा आनंद घेत आहात. आणि सोबतच ChatGPT आणि AI च्या मदतीनं पैसे देखील कमवत आहात, असं झालं तर? नक्कीच आपल्याला आनंद होईल. असंच एका तरुणासोबत घडलं आहे, ज्याने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे, या तरुणाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या तरुणाने अवघे 400 डॉलर 33 हजार रुपयांपासून ट्रेडिंग सुरू केली, त्याला हे पाहायचं होतं की, ChatGPT आणि AI खरच त्याला यामध्ये काही मदत करू शकतं का? त्यानंतर या तरुणाने ChatGPT आणि AI ला भरपूर डेटा पुरवला. स्प्रेडशीट्स, ऑप्शन, चेन, टेक्निकल चार्ट्स आणि त्यानंतर त्याने ChatGPT आणि AI विचारलं की मला असा ट्रेड दे ज्यामधून मला दुप्पट फायदा होऊ शकतो.
तुमचाही विश्वास बसणार नाही,त्यानंतर या व्यक्तीनं चॅट जीपीटी आणि एआयच्या मदतीनं अवघ्या दहा दिवसांमध्ये आपले पैसे डबल केले, त्याने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला, त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून, या पोस्टवर कमेंट करताना अनेकांनी असं म्हटलं आहे की, आम्ही देखील ही युक्ती करून पाहातो, जाणून घेऊयात काय आहे नेमकं प्रकरण?
या व्यक्तीनं ChatGPT आणि AI सुचवल्यानुसार दहा दिवसांमध्ये 18 ट्रेड केले, त्यातील 17 ट्रेड त्याने क्लोज केले आहेत, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये ChatGPT आणि AI चा सक्सेस रेट 100 टक्के राहिला आहे. ChatGPT ने सूचवलेले 13 पैकी 13 ट्रेड योग्य होते, तर एआय ने सूचनवलेले पाचही ट्रेड योग्य होते. त्यामुळे या तरुणाचा उत्साह आता आणखी वाढला असून, पुढील सहा महिने आपण अशा पद्धतीचे ट्रेड सुरू ठेवणार असल्याचं या तरुणानं म्हटलं आहे. त्याचे पैसै अवघ्या दहा दिवसांमध्ये डबल झाले आहेत.
डिस्क्लेमर : वरील महिती ही फक्त उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाहीत, कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
