AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१०वी पास विद्यार्थ्यांसाठी सुझुकी मोटर्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी! पगार ₹१५,००० लगेच अर्ज करा

१०वी पास झालात आणि चांगल्या करिअरच्या शोधात आहात? मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे! सुझुकी मोटर्स तुम्हाला नोकरीसोबत शिकण्याची आणि दरमहा ₹१५,००० पेक्षा जास्त कमावण्याची संधी देत आहे. ५०० हून अधिक जागा आहेत! पण... ही संधी तुमच्याकडे मिळवण्यासाठी फक्त २ दिवस आहेत! तर लवकरात लवकर पात्रता, वेळ आणि ठिकाण जाणून घ्या.

१०वी पास विद्यार्थ्यांसाठी सुझुकी मोटर्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी! पगार ₹१५,००० लगेच अर्ज करा
JobsImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Apr 17, 2025 | 3:37 PM
Share

१०वी झाल्यानंतर पुढे काय करायचं, ही अनेक तरुणांची मोठी चिंता असते. शिक्षण चालू ठेवावं की नोकरी शोधावी, याबाबत गोंधळ असतो. अशा तरुणांसाठी एक जबरदस्त संधी समोर आली आहे. सुझुकी मोटर्सने गुजरातमधील आपल्या हंसलपूर येथील प्लांटसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत उमेदवारांना ‘शिका आणि कमवा’ (Learn & Earn) या योजनेतून प्रत्यक्ष काम करत शिकण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेत ५०० हून अधिक पदं भरली जाणार आहेत. आणि विशेष म्हणजे, यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला ₹१५,०६७ इतका पगार मिळणार आहे. यासोबतच दोन वर्षांचं प्रशिक्षण दिलं जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर ITI NCVT चं अधिकृत प्रमाणपत्र देखील दिलं जाणार आहे, जे पुढील करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

या संधीसाठी निवड प्रक्रिया फक्त एका दिवसासाठीच आयोजित केली गेली आहे – ११ एप्रिल २०२५ (शुक्रवार) रोजी, लखनौ (उत्तर प्रदेश) येथे. त्यामुळे तुमच्याकडे तयारीसाठी जेमतेम काहीच तास उरले आहेत!

या नोकरीसाठी पात्रता काय आहे?

उमेदवार १०वी पास असावा.

इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषय असणे आवश्यक.

किमान ४०% गुण हवेत.

वय: १८ ते २१ वर्षे (११ एप्रिल २०२५ रोजी)

सध्या ही संधी फक्त पुरुषांसाठी उपलब्ध आहे.

इंटरव्ह्यू साठी कुठे जायचं?

ठिकाण: शासकीय ITI, अलीगंज, लखनौ, उत्तर प्रदेश

वेळ: सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहा

इंटरव्ह्यू साठी कोणत्या कागद पत्रांची अवश्यकता आहे ?

1. बायोडाटा (Resume)

2. आधार कार्ड

3. दोन पासपोर्ट साईज फोटो

4. १०वीचे मूळ आणि झेरॉक्स प्रमाणपत्र

ही भरती केवळ नोकरीसाठी नाही, तर कौशल्य विकासासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही संधी योग्य वापरून घ्या. जर तुम्ही पात्र असाल आणि प्रवास करू शकत असाल, तर वेळ वाया घालवू नका – थेट लखनौ गाठा आणि तुमचं भविष्य उज्वल करा!

१०वी पास तरुण (पुरुष) असाल आणि वय १८-२१ दरम्यान असेल, तर सुझुकी मोटर्स गुजरातमध्ये ‘शिका आणि कमवा’ योजनेअंतर्गत नोकरीची मोठी संधी आहे! दरमहा ₹१५,०००+ स्टायपेंड आणि २ वर्षांनी ITI प्रमाणपत्र मिळेल. पण निवड प्रक्रिया फक्त ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता शासकीय आयटीआय, अलीगंज, लखनौ (उत्तर प्रदेश) येथे आहे. संधी चुकवू नका!

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.