Google Internship : तरुणांसाठी जबरदस्त ऑफर! Google विंटर इटर्नशिपमधून करा कमाई

Google Internship : गुगलमध्ये करिअर करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. गुगल या क्षेत्रातील तरुणांचा शोध घेत आहे. Winter Internship साठी गुगलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांना स्टायपेंड पण देण्यात येणार आहे.

Google Internship : तरुणांसाठी जबरदस्त ऑफर! Google विंटर इटर्नशिपमधून करा कमाई
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 3:05 PM

नवी दिल्ली | 12 सप्टेंबर 2023 : तुम्हाला करिअरच्या सुरुवातीलाच दिग्गज कंपनीत काम करण्याची संधी मिळाली तर? अनेकदा करिअरच्या सुरुवातीला काहींना संघर्ष करावा लागतो. तर काहींना सहज चांगली नोकरी मिळते. आता पण गुगल तरुणांच्या त्यांच्या करिअरची सुरुवात करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देत आहे. तुम्हाला चांगल्या कंपनीसोबत काम करण्याची संधी हवी असेल तर गुगलमध्ये इंटरर्नशिपची ही संधी सोडू नका. गुगल (Google Winter Internship 2024) तांत्रिकदृष्ट्या कुशल तरुणांच्या शोधात आहे. या इंटर्नशिपच्या माध्यमातून तुम्हाला करिअरच्या सुरुवातीलाच भरारी घेण्याची संधी चालून आली आहे. अनुभवासोबत गुगलकडून निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड (Stipend) पण देण्यात येणार आहे. हा अनुभव भविष्यात तुम्हाला उपयोगी ठरेल. त्याआधारे तुम्ही गुगलसह दिग्गज कंपन्यांमध्ये नशीब आजमावू शकता.

कशासाठी करणार निवड

गुगलने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिपची ऑफर दिली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना, मुख्य उत्पादने आणि सेवांमध्ये भूमिका बजावावी लागेल. गुगलला तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी तुमची गरज पडणार आहे. हे आव्हान जो लिलया पेलेल त्याच्यासाठी पुढे आकाश पण मोकळे असेल. सर्च क्वालिटी, कंम्युटिंग प्लॅटफॉर्म आणि नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज विकसीत करणे, व्हिडिओ इनडेक्सिंग, तांत्रिक त्रुटी, चुका शोधणे आणि इतर अनेक टास्क यामध्ये करावे लागतील. यामध्ये उमेदवारांना गुगलची सध्याची उत्पादनं आणि सेवा यामध्ये सुधारणा करण्यासाठी, त्या विकसीत करण्यासाठी, सॉफ्टवेअर एप्लिकेशन रिसर्च करणे, कॉन्सेप्ट तयार करणे, डेव्हलप करण्याची संधी मिळेल.

हे सुद्धा वाचा

महत्वाचे मुद्दे

  • वेतन : 83,947 रुपये प्रति महिना
  • नोकरीचे स्थान : बेंगळुरु आणि हैदराबाद
  • अंतिम तारीख : 1 ऑक्टोबर 2023 पूर्वी अर्ज करावा लागेल
  • कालावधी : जानेवारी 2024 ते पुढील 22-24 आठवडे

कसा करणार अर्ज : तुमचा अद्ययावत सीव्ही, बायोडाटा तयार ठेवा. गुगलच्या संबंधित वेबसाईटवर जाऊन रिझ्युम सेक्शन निवडा. तिथे बायोडाटा अपलोड करा. या ठिकाणी आवश्यक ती माहिती तपशीलासह भरा. योग्य माहिती जमा करा. तुम्हाला नोकरीसाठी बंगळुरु, हैदराबाद यापैकी कोणतेही स्थान योग्य वाटते, ते निवडा.

या लिंकवर पाठवा अर्ज : https://cse.noticebard.com/internships/google-winter-internship-2024/

आवश्यक पात्रता

गुगलने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिपची ऑफर दिली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना, मुख्य उत्पादने आणि सेवांमध्ये भूमिका निभवावी लागेल. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील पदवी, मास्टर डिग्री आवश्यक आहे. C, C++, Java, JavaScript, Python या भाषेचे ज्ञान असावे. कोडिंगची आवड असावी. इतर माहिती तुम्हाला संबंधित लिंक मिळेल.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.