India Post GDS 2021: पोस्ट खात्यातील 4269 पदांसाठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ; इथे करा अर्ज

India Post GDS 2021: पोस्ट खात्यातील 4269 पदांसाठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ; इथे करा अर्ज
दहावी पास उमेदवारांसाठी टपाल विभागात बंपर भरती

भारतीय पोस्ट खात्याने ग्रामीण डाक सेवकाच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. (India Post GDS Recruitment 2021: apply for 4269 posts in Gujarat & Karnataka )

भीमराव गवळी

|

Jan 21, 2021 | 7:08 PM

नवी दिल्ली: भारतीय पोस्ट खात्याने ग्रामीण डाक सेवकाच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. नव्या नोटिफिकेशन्सनुसार गुजरात आणि कर्नाटक पोस्ट सर्कलमधील 4269 पदांसाठी उमेदवारांना आता 23 जानेवरीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी 20 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. आता अर्ज करण्यासाठी आणखी दोन दिवस मिळाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (India Post GDS Recruitment 2021: apply for 4269 posts in Gujarat & Karnataka )

ग्रामीण डाक सेवक पदासाठी 10 वी पर्यंत शिक्षण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. भारतीय डाक विभागाच्या appost.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खुल्या आणि ओबीसी वर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. तर एससी आणि एसटी वर्गातील महिला उमेदवारांना नि:शुल्क अर्ज करता येणार आहे.

या राज्यांमध्ये भरती

ग्रामीण डाक सेवक पदासाठी केवळ कर्नाटक आणि गुजरात सर्कलमध्ये भरती होणार आहे. कर्नाटक पोस्टल सर्कलमध्ये 2443 आणि गुजरात सर्कलमध्ये 1826 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आल्याने अर्ज करण्यासाठी आता उमेदवारांना तीन दिवसांचा अवधी मिळाला आहे.

अशी होणार निवड

उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल. या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. ऑनलाईन जमा अर्जाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून निवड केली जाईल. ही निवड करताना केवळ इयत्ता 10वीच्या गुणांचाच विचार केला जाणार आहे. उच्च शिक्षितांना या भरतीचा कोणताही अतिरिक्त लाभ मिळणार नाही. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावं, असं डाक विभागाने स्पष्ट केलं आहे. तसेच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन्स वाचूनच अर्ज करावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे. (India Post GDS Recruitment 2021: apply for 4269 posts in Gujarat & Karnataka )

संबंधित बातम्या:

Logo Contest | सरकारचे ‘एक’ काम करा नि हजारो रुपये जिंकण्याची संधी मिळावा!

SBI PO Prelims Result 2021: स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

10 वी पासना उच्च न्यायालयात नोकरीची संधी; 1,73,200 रुपये मिळणार पगार

(India Post GDS Recruitment 2021: apply for 4269 posts in Gujarat & Karnataka )

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें