MES Recruitment 2021 : ड्राफ्ट्समन आणि सुपरवायझर पदासाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज

या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट mes.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Job Opportunity for the post of Draftsman and Supervisor in MES, apply soon)

MES Recruitment 2021 : ड्राफ्ट्समन आणि सुपरवायझर पदासाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज
ड्राफ्ट्समन आणि सुपरवायझर पदासाठी नोकरीची संधी

नवी दिल्ली : मिलिट्री इंजीनियर सर्विसेज (MES)ने सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आणली आहे. ड्राफ्टमॅन आणि पर्यवेक्षकाच्या 502 पदांच्या भरतीसाठी एमईएसकडून अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट mes.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Job Opportunity for the post of Draftsman and Supervisor in MES, apply soon)

ड्राफ्ट्समन आणि सुपरवायझर पदावर जाहीर झालेल्या या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया 12 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. अर्जाची तारीख झाल्यानंतर वेबसाईटवरून ही लिंक काढून टाकण्यात येईल. ज्या उमेदवारांना या परीक्षांसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या रिक्त पदासाठी परीक्षा 16 मे 2021 रोजी घेण्यात येईल.

पात्रता

या व्हॅकेन्सीअंतर्गत ड्राफ्ट्समन पदासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून आर्किटेक्चरमध्ये पदविका पदवी असणे आवश्यक आहे. तर पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / व्यवसाय अभ्यास / सार्वजनिक प्रशासन या विषयात एक वर्षाची मास्टर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / व्यवसाय अभ्यास / लोक प्रशासन किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधर उमेदवारही अर्ज करू शकतात. पात्रतेच्या पूर्ण माहितीसाठी अधिकृत सूचना तपासा.

रिक्त पदांचा तपशील

या व्हॅकेन्सीअंतर्गत एकूण 502 पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पर्यवेक्षक पदासाठी 450 पदे आहेत. यापैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 183 पदे, ओबीसीसाठी 120 पदे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागासाठी 45 जागा, अनुसूचित जमातीसाठी 69 आणि एसटीसाठी 33 जागा निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय ड्राफ्टमॅन पदासाठी 52 पदे निर्धारीत आहेत.

परीक्षा केंद्रे

या पदांसाठी प्रयागराज (अलाहाबाद), लखनऊ, बरेली, दिल्ली, चंदीगड, जबलपूर, भोपाळ, जयपूर, रांची, नागपूर, देहरादून, कोलकाता, गुवाहाटी, गांधीनगर, कोची, पठाणकोट, चेन्नई, पोर्ट ब्लेअर, पुणे, शिलांग आणि सिलीगुडीसह अनेक शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे

असा करा अर्ज

ड्राफ्ट्समन आणि सुपरवायझर पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा.

– प्रथम अधिकृत संकेतस्थळ mes.gov.in वर जा
– वेबसाईटच्या मुख्य पृष्ठाच्या डाव्या बाजूला नवीन नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा.
– यानंतर ‘Application for the Post [Draughtsman (D’Man)] OR [Supervisor Barrack Store (Supvr BS)]’ येथे जा.
– आता आपला तपशील भरा आणि नोंदणी करा.
– नोंदणीनंतर अर्ज भरता येईल.
– अर्ज भरल्याची खात्री करा. (Job Opportunity for the post of Draftsman and Supervisor in MES, apply soon)

इतर बातम्या

64 दिवसांत फाशीची शिक्षा, नांदेडमधील बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात कोर्टाचा जलद निकाल

मुलीने आधी रेस्टॉरंटमध्ये पोटभर खाऊ घातलं, मग दारु पाजली, नंतर वडिलांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं, थरार सीसीटीव्हीत कैद

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI