AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IOB मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! जाणून घ्या पगार, पदे आणि अर्ज कसा करायचा ?

बँकेत नोकरी म्हणजे चांगला पगार, नोकरीची सुरक्षितता आणि सामाजिक मान-सन्मान ही अनेकांची स्वप्नपूर्ती असते. तुमचंही असंच स्वप्न असेल, तर इंडियन ओव्हरसीज बँक तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे.

IOB मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! जाणून घ्या पगार, पदे आणि अर्ज कसा करायचा ?
| Edited By: | Updated on: Jun 02, 2025 | 10:04 PM
Share

बँकेतील नोकरी ही केवळ चांगल्या पगारापुरती मर्यादित नाही, तर ती नोकरीची सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य यासाठी देखील ओळखली जाते. त्यामुळेच बँकींग क्षेत्रात नोकरी मिळवणं हे आजच्या तरुणांचं मोठं ध्येय ठरत आहे. सरकारी किंवा सार्वजनिक बँकांमध्ये वेळेवर पगार, भरपूर सुट्ट्या, वैद्यकीय सुविधा, भत्ते आणि नोकरीची दीर्घकालीन शाश्वती ही मुख्य आकर्षणं असतात.

इंडियन ओव्हरसीज बँकेने (Indian Overseas Bank – IOB) ‘लोकल बँक ऑफिसर’ (LBO) पदासाठी तब्बल ४०० रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती देशभरातील विविध शाखांमध्ये केली जाणार असून, बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम आणि प्रतिष्ठित संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइट iob.in वर ऑनलाइन अर्ज दाखल करावेत.

पगार आणि फायदे काय असणार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹८५,९२० इतका आकर्षक पगार मिळणार आहे. यासोबतच महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), सिटी अलाउन्स (CCA), लीज भत्ता, तसेच बँकेच्या धोरणांनुसार इतर सुविधा आणि लाभही मिळणार आहेत. त्यामुळे ही नोकरी केवळ प्रतिष्ठेचीच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता काय?

1. वयमर्यादा: अर्जदाराचं वय २० ते ३० वर्षांदरम्यान असावं. अनुसूचित जाती, जमाती, इत्यादी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

2. शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. पदवी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली असावी.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड दोन टप्प्यांत केली जाईल:

1. ऑनलाइन लेखी परीक्षा: यात सामान्य ज्ञान, बँकिंग-अर्थशास्त्र, बुद्धिमापन, इंग्रजी भाषा व संगणक कौशल्य यासंबंधी प्रश्न असतील.

2. मुलाखत (Interview): लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. या दोन्ही टप्प्यांमधील एकूण कामगिरीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

अर्ज कसा करायचा?

उमेदवारांनी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या iob.in या वेबसाइटवर जाऊन संबंधित भरतीच्या विभागात लॉग इन करावं आणि आपला अर्ज सादर करावा. अर्ज करताना आपली शैक्षणिक प्रमाणपत्रं, ओळखपत्र, फोटो आणि स्वाक्षरी यांची स्कॅन प्रत अपलोड करणं आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फी भरण्याचीही आवश्यकता असेल.

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....