AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navy MR Notification: नौदलात मॅट्रिक रिक्रूट सेलरच्या भरतीसाठी अधिसूचना जारी, 300 पदांसाठी संधी

या रिक्त पदांसाठी त्यांच्या अर्जाच्या तपशीलांवर आधारित निवड प्रक्रियेचा भाग म्हणून सुमारे 1500 उमेदवारांना लेखी चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीएफटी) साठी बोलावले जाईल. तसेच लेखी परीक्षेला बसण्यासाठी कट-ऑफ निर्धारित केले जाऊ शकते, ते प्रत्येक राज्यात भिन्न असू शकते.

Navy MR Notification: नौदलात मॅट्रिक रिक्रूट सेलरच्या भरतीसाठी अधिसूचना जारी, 300 पदांसाठी संधी
indian navy
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 12:07 AM
Share

नवी दिल्ली : Indian Navy MR Notification 2021: मॅट्रिकसाठी नौदलात सरकारी नोकरी अर्थात 10 वी पाससाठी सरकारी नोकरी आहे. भारतीय नौदलाने एप्रिल 2022 मधल्या रिक्रूटसाठी नाविक म्हणून मॅट्रिक भरती (MR) च्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलीय. नेव्ही एमआर एप्रिल 2022 जाहिरातीनुसार निवडलेल्या उमेदवारांसाठी सुमारे 300 रिक्त जागा आहेत. या रिक्त पदांसाठी त्यांच्या अर्जाच्या तपशीलांवर आधारित निवड प्रक्रियेचा भाग म्हणून सुमारे 1500 उमेदवारांना लेखी चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीएफटी) साठी बोलावले जाईल. तसेच लेखी परीक्षेला बसण्यासाठी कट-ऑफ निर्धारित केले जाऊ शकते, ते प्रत्येक राज्यात भिन्न असू शकते.

नेव्ही एमआर भरती 2021 अर्ज प्रक्रिया

भारतीय नौदलात मॅट्रिक भरती 2021-22 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना नौदल भरती पोर्टल, joinindiannavy.gov.in वर सक्रिय करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि उमेदवार 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून नेव्ही एमआर भरती 2021 अधिसूचना काळजीपूर्वक वाचली पाहिजे.

नेव्ही एमआर भरती 2021 साठी पात्रता

भारतीय नौदलाने एप्रिल 2022 बॅचसाठी जारी केलेल्या एमआर अधिसूचना 2021 नुसार अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक अर्थात दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांचा जन्म 1 एप्रिल 2002 पूर्वीचा नसावा आणि 31 मार्च 2005 नंतरचा असावा.

नेव्ही एमआर भरती 2021 निवड प्रक्रिया

MR च्या एकूण 300 रिक्त पदांसाठी अर्जाच्या आधारावर सुमारे 1500 उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. परीक्षेत हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील आणि परीक्षेचा कालावधी 30 मिनिटांचा असेल. हे प्रश्न गणित आणि विज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयातून विचारले जातील. प्रश्नांची पातळी दहावीची असेल. उमेदवार नौसेना भरती पोर्टलवरून अभ्यासक्रम डाऊनलोड करू शकतात.

संबंधित बातम्या

mhada recruitment 2021: म्हाडात नोकरीची संधी; अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

मोठी बातमी: राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.