NIFT Recruitment 2021 : नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती, जाणून घ्या तपशील

NIFT Recruitment 2021 : नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती, जाणून घ्या तपशील
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती

नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने (National Institute of Fashion Technology, NIFT) प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत एकूण 21 पदांवर नेमणुका करण्यात येतील. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र अर्जदार नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) च्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी उमेदवार 7 मे पर्यंत अर्ज करू शकतात. (Recruitment for Professor posts in National Institute of Fashion Technology)

नोकरीसाठी आवश्यक पात्रता

निफ्टने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्राध्यापकांच्या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून एमफिल किंवा पीएचडी पदवी घेतलेली असावी. या व्यतिरिक्त उमेदवारास संबंधित क्षेत्रात किमान पंधरा वर्षांचा अनुभव असावा. त्याचबरोबर या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 50 वर्षे असावे.

अर्ज करण्याची शेवटची 7 एप्रिल

अर्ज करताना उमेदवारांनी हे लक्षात ठेवा की प्राध्यापकांच्या पदावर अर्ज करण्यासाठी, राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी (निफ्ट) च्या जॉब नोटिफिकेशन 2021 वर 7 मे 2021 रोजी किंवा त्याआधी निर्धारीत अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून अर्ज करा. या व्यतिरिक्त अर्ज पात्रता, अनुभव, वय, जात यासंबंधित कागदपत्रांच्या स्वत: ची साक्षांकित प्रती सबमिट करा. याव्यतिरिक्त नॉन-रिफंडेबल डिमांड ड्राफ्टवर केला जाऊ शकतो.

वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एनआयएफटीची स्थापना

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (निफ्ट)ची सुरवात 1986 मध्ये दिल्लीनमध्ये झाली. सुरुवातीला तात्पुरत्या दोन खोल्यांमधून या इन्स्टिट्युटची सुरवात करण्यात आली. त्यानंतर 1994 मध्ये निफ्ट कायमस्वरुपी कॅम्पसमध्ये स्थानांतरीत झाले. संस्थेत फॅशन गारमेंट्स, पारंपारिक वेशभूषा, फॅब्रिक स्विचेस आणि टेक्सटाईल आणि 15,000 पेक्षा अधिक पुस्तके असलेल्या रिसोर्स सेंटरचा समावेश आहे. 1986 मध्ये भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एनआयएफटी ची स्थापना केली गेली. ही एक वैधानिक संस्था आहे जी एनआयएफटी अधिनियम 2006 द्वारे संचालित आहे. सध्या देशभरात 17 कॅम्पस असून एनआयएफटी चेन्नई, एनआयएफटी बेंगलुरू, एनआयएफटी पटना, एनआयएफटी गांधीनगर , एनआयएफटी हैदराबाद आणि एनआयएफटी कोलकाता यांच्यासह अन्य कॅम्पसचा समावेश आहे. (Recruitment for Professor posts in National Institute of Fashion Technology)

इतर बातम्या

‘या’ देशात कांदे बटाट्यापेक्षाही सहजपणे बंदुका उपलब्ध, ‘गन कल्टर’चा जगातील एकमेव देश

Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसरण; झटपट तपासा नवे दर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI