AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Army Recruitment 2021 : आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये भरती, असा करा नोकरीसाठी अर्ज

बीडीएस किंवा एमडीएस पदवी असलेले उमेदवार या पदांवर अर्ज करू शकतात आणि भरतीमध्ये सामील होऊ शकतात. रिक्त स्थानाची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली गेली आहे. (Recruitment in Army Dental Corps, Apply on joinindianarmy.nic.in)

Army Recruitment 2021 : आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये भरती, असा करा नोकरीसाठी अर्ज
आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये भरती
| Updated on: Apr 24, 2021 | 4:34 PM
Share

Army Recruitment 2021 नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलात(Indian Army job) नोकरीची संधी निर्माण झाली आहे. भारतीय सैन्याच्या डेंटल कॉर्प्स(Dental Core)ने शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार एकूण 37 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या रिक्त पदासाठी(Army Recruitment 2021) पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2021 निश्चित करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. बीडीएस किंवा एमडीएस पदवी असलेले उमेदवार या पदांवर अर्ज करू शकतात आणि भरतीमध्ये सामील होऊ शकतात. रिक्त स्थानाची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली गेली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (Army Recruitment 2021) 19 एप्रिल 2021 पासून सुरू झाली आहे. (Recruitment in Army Dental Corps, Apply on joinindianarmy.nic.in)

कोण करू शकेल अर्ज?

भारतीय सैन्याच्या भरती पोर्टलने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या संस्थेचा बीडीएस किंवा एमडीएस पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एक वर्षाची अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप केलेली असावी. या व्यतिरिक्त अनेक पात्रता मागविण्यात आल्या आहेत. अर्जासाठी या पात्रता असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा किती?

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 31 डिसेंबर 2021 पर्यंत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नसावेत. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत सूचना पाहू शकता. अधिकृत सूचना पाहण्यासाठी वेबसाईटवर क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना भारतीय सैन्य भरती वेबसाइट, joinindianarmy.nic.in येथे भेट द्यावी लागेल. येथे रिक्त जागेची तपशीलवार माहिती आणि अर्ज भरण्यासाठी लिंक मिळेल. अर्ज भरण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी अधिसूचना संपूर्ण वाचली पाहिजे. अर्जात काही चूक असल्यास फॉर्म नाकारला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – 19 एप्रिल 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 18 मे 2021 अधिकृत वेबसाइट – joinindianarmy.nic.in

आर्मी डेंटल कॉर्प्स 2021 निवड प्रक्रिया

पात्र उमेदवारांची निवड तीन टप्प्यातील परीक्षेच्या आधारे केली जाईल. उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग लेखी, मुलाखत व वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल. (Recruitment in Army Dental Corps, Apply on joinindianarmy.nic.in)

इतर बातम्या

Corona Cases and Lockdown News LIVE : 9 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशात पाठवला, छगन भुजबळ यांचा आरोप

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाने पुन्हा हाहा:कार, सैन्याने 430 लोकांना बाहेर काढलं, आठ जणांचा मृत्यू, अजूनही शेकडो अडकल्याची भीती

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.