UPSC NDA Answer Key 2021 : गणित आणि जीएटी परीक्षेसाठी उत्तर पत्रिका जाहीर, असे करा डाउनलोड

युपीएससी एनडीए अर्ज(UPSC NDA Application Form) भरण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2021 होती, तर उमेदवारांना 27 जानेवारी 2021 ते 2 फेब्रुवारी 2021 रोजी संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. (UPSC NDA Answer Key 2021 announced, check it on www.upsc.gov.in)

UPSC NDA Answer Key 2021 : गणित आणि जीएटी परीक्षेसाठी उत्तर पत्रिका जाहीर, असे करा डाउनलोड
यूपीएससीच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचे यश

UPSC NDA Answer Key 2021 नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी आणि नेव्हल अॅकॅडमीच्या गणित आणि जीएटी परीक्षेसाठी उत्तर पत्रिका जाहीर केली आहे. 18 एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेत भाग घेतलेले विद्यार्थी www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उत्तर पत्रिका डाऊनलोड करु शकतात. युपीएससी एनडीए अर्ज(UPSC NDA Application Form) भरण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2021 होती, तर उमेदवारांना 27 जानेवारी 2021 ते 2 फेब्रुवारी 2021 रोजी संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. युनियन लोकसेवा आयोगाकडून सैन्य, नौदल आणि हवाई दलाच्या 147 व्या अभ्यासक्रमासाठी एनडीएची परीक्षा घेण्यात आली होती. (UPSC NDA Answer Key 2021 announced, check it on www.upsc.gov.in)

UPSC NDA Answer Key 2021 असे करा डाउनलोड

उमेदवार खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करुन उत्तर पत्रिका डाउनलोड करु शकतात.

स्टेप 1 : उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर जावे.
स्टेप 2 : यानंतर वेबसाइटवर दिलेल्या Examination टॅब वर क्लिक करा.
स्टेप 3 : आता Answer Key च्या टॅब वर क्लिक करा.
स्टेप 4 : यानंतर Maths आणि GAT च्या लिंक वर क्लिक करा.
स्टेप 5 : उत्तर पत्रिका आपल्या स्क्रीन वर ओपन होईल.
स्टेप 6 : आता डाउनलोडच्या ऑप्शन वर क्लिक करा आणि डाउनलोड करा.

18 एप्रिल 2021 रोजी ऑफलाईन झाली परीक्षा

युपीएससी एनडीए 2021 ची लेखी परीक्षा 18 एप्रिल 2021 रोजी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गणिताचा पेपर -1 सकाळच्या शिफ्टमध्ये (सकाळी 10 ते दुपारी 12.30) घेण्यात आला आणि प्रत्येक प्रश्न 2.5 गुणांचा होता. सामान्य क्षमता चाचणी (GAT) पेपर -2 दुपारी शिफ्टमध्ये (दुपारी 2 ते सायंकाळी 4.30) घेण्यात आला आणि प्रत्येक प्रश्न 4 गुणांचा होता. सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ एमसीक्यू स्वरूपात होते आणि चुकीच्या उत्तरांसाठी 1/3 गुणांची नकारात्मक मार्किंग असेल. लेखी परीक्षेचा कटऑफ क्लिअर करणाऱ्या उमेदवारांची एसएसबी मुलाखत फेरीसाठी निवड करण्यात येईल जी 900 गुणांची असेल. (UPSC NDA Answer Key 2021 announced, check it on www.upsc.gov.in)

इतर बातम्या

सर्वोच्च न्यायालयाच्या 48 व्या सरन्यायाधीशपदी एन.व्ही. रमणा; रामनाथ कोविंद, नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथ

गाणं ऐकून रेल्वेचा अधिकारी म्हणाला, ‘बेटा, रेल मे नोकरी करोगी?’; वाचा, गायिका निशा भगत यांचा किस्सा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI