देशाच्या 48 व्या सरन्यायाधीशपदी एन.व्ही. रमणा; रामनाथ कोविंद, नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथ

सर्वोच्च न्यायालयाचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमणा यांनी शपथ घेतली आहे. (justice nv ramana justice sharad bobde)

देशाच्या 48 व्या सरन्यायाधीशपदी एन.व्ही. रमणा; रामनाथ कोविंद, नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथ
chief Justice-NV-Ramana
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 4:11 PM

नवी दिल्ली : देशाचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमणा (N.V Ramana) यांनी आज (24 एप्रिल) शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमणा यांना सरन्यायाधीशपदाची (Chief Justice of India) शपथ दिली. रमणा हे 26 ऑगस्ट 2022 पर्यंत म्हणजेच पुढील 16 महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील. मागील महिन्यात माजी सरन्यायाधीश शरद बोबडे (Sharad Bobde) यांनी एन. व्ही. रमणा यांच्या नावाची सरन्यायाधीशपदासाठी शिफारस केली होती. शरद बोबडे हे शुक्रवारी (23 एप्रिल) सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाले होते. (justice N.V Ramana takes oath as 48 Chief Justice of India after the retirement of Justice Sharad Bobde)

दोन वर्षांनी सेवानीवृत्त होणार

सरन्यायाधीस एन. व्ही. रमणा यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबतच उपराष्ट्रपती वंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कायदामंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. रमणा 2022 मध्ये सेवानीवृत्त होणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल. रमणा हे 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर रुजू होण्यापूर्वी  दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

देशाचे 48 वे सरन्यायाधीश रमणा कोण आहेत ?

न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा हे सरन्यायधीश शरद बोबडे यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. नुथुलापटी वेंकट रमणा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 रोजी झाला होता. रमणा हे आंध्र प्रदेशातील शेतकरी कुटुंबातील आहेत. जून 2000 मध्ये त्यांची आंध्र प्रदेशच्या हायकोर्टात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केले. सुप्रीम कोर्टात 2014 पासून ते कार्यरत आहेत. सरन्यायाधीश रमणा यांनी 10 फेब्रुवारी 1983 मध्ये वकिलीचे काम सुरु केले. चंद्रबाबू नायडू यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी आंध्र प्रदेश सरकारचे अ‌ॅडिशनल अ‌ॅडव्होकेट जनरल म्हणूनसुद्धा काम पाहिलेले आहे. ते विज्ञान आणि कायद्याचे पदवीधर आहेत.

सरन्यायाधीशांची निवड कशी होते?

भारतात सरन्यायाधीशांची निवड राष्ट्रपतींकडून केली जाते. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश निवृत्त होण्यापूर्वी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून ज्येष्ठ न्यायमूर्तींच्या न्यायमूर्तींची शिफारस राष्ट्रपतींना करतात. राष्ट्रपती केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या सल्ल्यानं सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात. सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता.

इतर बातम्या :

‘अयोध्या खटल्यात शाहरुख खान मध्यस्थी करण्याची सरन्यायाधीशांची इच्छा’, निवृत्ती समारंभातच मोठा गौप्यस्फोट

केवळ महाराष्ट्रच नव्हे, ‘या’ राज्यांनाही 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण हवंय!

Parambir Singh : ‘मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन केलेली बेकायदेशीर बदली रद्द करा’, परमबीर सिंगांची मागणी

(justice N.V Ramana takes oath as 48 Chief Justice of India after the retirement of Justice Sharad Bobde)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.