CRPF GDMO Recruitment 2021 : सीआरपीएफमध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील

या भरतीअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यात वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. ही भरती प्रक्रिया जीडीएमओच्या 54 पदे भरण्यासाठी आयोजित केली जात आहे. (Recruitment of Medical Officer in CRPF, Know Full Details)

CRPF GDMO Recruitment 2021 : सीआरपीएफमध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील
प्रातिनिधिक फोटो

CRPF GDMO Recruitment 2021 नवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाने (CRPF) जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेअंतर्गत एकूण 54 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यात (CRPF GDMO Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी 04 मे 2021 रोजी अधिसूचना जारी केली गेली. सीआरपीएफमध्ये सरकारी नोकरीसाठी ही एक उत्तम संधी आहे. ज्या तरुणांना या पदावर अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यात वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. ही भरती प्रक्रिया जीडीएमओच्या 54 पदे भरण्यासाठी आयोजित केली जात आहे. यासाठी अर्ज करण्यापूर्वी (CRPF GDMO Recruitment 2021) उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार सीआरपीएफने 13 मे 2021 रोजी आयोजित वॉक-इन-मुलाखतीसाठी अर्ज करू शकतात. (Recruitment of Medical Officer in CRPF, Know Full Details)

भरतीचा तपशील

यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीर विभाग, उत्तर-पूर्व विभाग, मध्य विभाग आणि दक्षिण विभागात ठरलेल्या विविध केंद्रांवर वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्थित रहावे लागेल. उमेदवारांना त्यांचे अर्ज (बायोडेटा), 5 पासपोर्ट आकाराचे फोटो, सर्व कागदपत्रांची मूळ प्रत आणि प्रत्येकाची एक-एक फोटोकॉपी सोबत आणावी लागेल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की वॉक-इन-मुलाखतीसाठी कोणतेही टीए-डीए सीआरपीएफकडून दिले जाणार नाहीत. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (जीडीएमओ) या पदावर पोस्ट केलेल्या उमेदवारांना दरमहा 75,000 रुपये पगार देण्यात येईल.

पात्रता आणि वय मर्यादा

जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदावर भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेची एमबीबीएसची पदवी असावी आणि एमसीआयने ठरविलेल्या कालावधीची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. तसेच मुलाखतीच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (Recruitment of Medical Officer in CRPF, Know Full Details)

इतर बातम्या

Khatron Ke Khiladi 11 | केपटाऊनमध्ये पोहचले टीव्ही जगतातले ‘खिलाडी’, शूटिंग पूर्वी धमाल-मस्ती, पाहा फोटो

कोरोना काळातही Maruti Suzuki चा बाजारात धुमाकूळ, एप्रिलमध्ये रेकॉर्डब्रेक विक्री

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI