तुम्ही या विद्यापीठाचे तर विद्यार्थी नाहीत? 36 हजार डिग्र्या फेक

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे बनावट पदव्यांचा हा घोटाळा तब्बल 194 कोटी 17 लाखांचा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तुम्ही या विद्यापीठाचे तर विद्यार्थी नाहीत? 36 हजार डिग्र्या फेक
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 8:51 AM

सोलन : हिमाचल प्रदेशच्या सोलन इथल्या मानव भारती विद्यापीठात हिमाचल पोलिसांनी मोठ्या घोटाळ्याचा उलगडा केला आहे. हिमाचलच्या बनावट पदवी घोटाळ्यामुळे 17 राज्यात विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे बनावट पदव्यांचा हा घोटाळा तब्बल 194 कोटी 17 लाखांचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात एसआयटीच्या पथकाने 75 ठिकाणी छापे टाकून 275 जणांची चौकशी केली. विद्यापीठाने जारी केलेल्या एकूण 41,000 पदवींपैकी आतापर्यंत फक्त 5000 चं खऱ्या असल्याचं आढळून आलं आहे. (shocking university sold 36 thousand fake degrees only 5 thousand were found real in 11 years in himachal pradesh)

या प्रकरणात मुख्य आरोपी आणि मानव भारती ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार राणा यांना अटक करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. गंभीर म्हणजे या घोटाळ्याचं जाळं तब्बल 17 राज्यांमध्ये पसरलं आहे. ही खोटी डिग्री घेतेले अनेक विद्यार्थी हे 17 राज्यांमध्ये पसरले आहेत. इतकंच नाही तर हा घोटाळा आणखी मोठा होण्याची भीती एसआयटीने व्यक्त केली आहे. मानव भारती विद्यापीठात हा पदवी घोटाळा कसा झाला? याची चौकशी एसआयटीची टीम करत आहेत.

पोलिस महासंचालक (डीजीपी) संजय कुंडू यांनी शिमला इथं पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक संस्थांमध्ये हिमाचल प्रदेशात घोटाळं होण्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. ते म्हणाले की, एसआयटीच्या तपासणीदरम्यान पोलीस, ईडी आणि आयकर अधिकाऱ्यांचा साथीनं राणा आणि त्याच्या कुटुंबीयांनी रॅकेट तयार केलं आणि यातून तब्बल 387 कोटींची मालमत्ता हडपली आहे.

दरम्यान, या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली असून सगळ्यांची यामध्ये चौकशी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना डिग्री देण्याचं आश्वासन देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आणि हातात खोटी डिग्री दिल्याच्या या प्रकरणामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे घोटाळे गंभीर आहेत.

80 टक्क्याहून अधिक विद्यार्थ्यांची पदवी बनावट

विद्यापीठाच्या एकूण 41 हजार विद्यार्थ्यांपैकी 80 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांकडे बनावट डिग्री आहे. या बोगस व्यवसायामुळे मानव भारती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार राणा यांनी फक्त 11 वर्षात 440 कोटींचं वैभव उभं केलं. हिमाचल प्रदेशातला हा सगळ्यात मोठा घोटाळा घडवणाऱ्या राजकुमार राणा याला पोलिसांनी अटक केली असून या घोटाळ्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (shocking university sold 36 thousand fake degrees only 5 thousand were found real in 11 years in himachal pradesh)

संबंधित बातम्या –

MP NHM CHO 2021 : कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या 3570 पदांवर भरती

Special story | Sarkari Naukri 2021: 10 वी आणि 12 वी पासही अर्ज करू शकतात; ‘या’ विभागांत नोकरीची सुवर्णसंधी

Job Alert: 10 वी पाससाठी बंपर भरती, SSC MTS Exam 2020ची अधिसूचना ‘या’ तारखेला होणार जारी

(shocking university sold 36 thousand fake degrees only 5 thousand were found real in 11 years in himachal pradesh)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.