मोठी बातमी! 20 Youtube Channel आणि 2 वेबसाईट्सवर केंद्राची बंदी!

ज्या 20 युट्युब चॅनेल्स आणि 2 संकेत स्थलांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांनी राष्ट्रविरोधी माहिती प्रसारीत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबत त्यांनी खोट्या बातम्या प्रसारीत करुन राष्ट्राविरोधी काम केल्यानं त्यांना ब्लॉक करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलंय.

मोठी बातमी! 20 Youtube Channel आणि 2 वेबसाईट्सवर केंद्राची बंदी!
20 युट्युब चॅनेल्सवर बंदी!
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Dec 21, 2021 | 4:14 PM

नवी दिल्ली : 20 युट्युब चॅनल्स (YouTube) आणि 2 वेबसाईट्सवर (Website) बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रविरोधी माहिती त्याचप्रमाणे खोट्या बातम्या प्रसारीत केल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारनं (Government of India) 20 युट्युब चॅनेल्स आणि 2 संकेत स्थळांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. गुप्तचर यंत्रणेसोबत (Intelligence agencies) केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं (Ministry of Information & Broadcasting) संयुक्तपणे याबाबत आधी आढावा घेऊन अखेर ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रविरोधी कंटेटमुळे कारवाई

दरम्यान, ज्या 20 युट्युब चॅनेल्स आणि 2 संकेत स्थळांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांनी राष्ट्रविरोधी माहिती प्रसारीत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबत त्यांनी खोट्या बातम्या प्रसारीत करुन राष्ट्राविरोधी काम केल्यानं त्यांना ब्लॉक करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलंय. गेल्या सोमवारी याबाबतच्या कारवाईचा आदेशही जारी करण्यात आला आहे.

खोट्या बातम्या देणाऱ्यांना केंद्राचा दणका

पाकिस्तानातून या युट्युब चॅनेल आणि वेबसाईटचं काम चालत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. भारताविरोधात काम करणाऱ्या या चॅनेल्सवरील कारवाईनंतर आता राष्ट्रविरोधी कंटेट तयार करणाऱ्यांनाही दणका बसेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

दिशाभूल करण्याचं काम केल्यानं दणका

काश्मीर, सैन्य, अल्पसंख्याक, राम मंदिर, सीडीएस बिपीन राव, यांसारख्या संवेदनशील विषयांवर चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात होती, असं केंद्र सरकारनं म्हटलंय. याच युट्युब चॅनल्सवर शेतकरी आंदोलन, सीएए आंदोलन आणि अल्पसंख्यांकाना भडकवण्याचंही काम सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकशाहीविरोधी काम करणाऱ्या या युट्युब चॅनेल्सद्वारे आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्येही चुकीची माहिती प्रसारीत केली जाऊ शकते, अशी भीती केंद्रानं व्यक्त केली आहे.

खोट्या बातम्या देणाऱ्यांना केंद्राचा दणका

दरम्यान युट्युबवर असलेल्या आणि खोटी माहिती प्रसारीत करणाऱ्यांची एक यादीही जारी करण्यात आली आहे. या यादीत नेमके कोणते चॅनेल्स आहेत, त्यावरही एक नजर टाकुया.

Fictional (फिक्शनल)

Source – GOI

Historical Facts (हिस्टोरीकल फॅक्ट्स)

Source – GOI

Punjab Viral (पंजाब व्हायरल)

Source – GOI

Naya Pakistan Global (नया पाकिस्तान ग्लोबल)

Source – GOI

The Punch Line (दी पंच लाईन)

Source – GOI

Cover Story (कव्हर स्टोरी)

Source – GOI

Go Global eCommerce (गो ग्लोबल ई-कॉमर्श)

Source – GOI

Junaid Haleem Official (जुनैद हलीम ऑफिशियल)

Source – GOI

Tayyab Hanif (तय्यब हनिफ)

Source – GOI

Zain Ali Official (झैन अली ऑफिशियल)

Source – GOI

Mohsin Rajput Official (मोहसिन राजपूर ऑफिशियल)

Source – GOI

Kaneez Fatima (कानिझ फातिमा)

Source – GOI

Sadaf Durrani (सडाफ दुरानी)

Source – GOI

Mian Imran Ahmad (मियान इम्रान अहमद)

Source – GOI

Najam Ul Hassan Bajwa (नजाम उल हसन बाजवा)

इतर बातम्या – 

KMC Election Result 2021: पश्चिम बंगालमध्ये ‘दीदीगिरी’ कायम, कोलकाता महापालिकेत टीएमसीचा दणदणीत विजय; भाजपचा सुपडा साफ

UPSC विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक; सर्व श्रेणींच्या रेल्वे तिकिटावरील सवलती एका क्लिकवर

Devendra Fadnavis Live | महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु : देवेंद्र फडणवीस

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें