AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुंदर मुलांना पाहताक्षणी पाण्यात बुडवायची; स्वतःच्या लेकरालाही सोडलं नाही… नेमकं प्रकरण काय?

एक धक्क्दायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला लहान मुलांना पाण्यात बिडवून त्यांची क्रूरपणे हत्या करायची. तिने स्वत:च्या लेकराला देखील सोडले नाही. ती कशी पकडली गेली वाचा...

सुंदर मुलांना पाहताक्षणी पाण्यात बुडवायची; स्वतःच्या लेकरालाही सोडलं नाही... नेमकं प्रकरण काय?
Crime Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 03, 2025 | 8:25 PM
Share

हरियाणातील पानीपत जिल्ह्यातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सुंदर चेहऱ्याची मुले-मुली पाहिली की ती स्त्री त्यांना पाण्यात बुडवून मारून टाकायची. कारण फक्त एवढंच की कोणीही तिच्यापेक्षा जास्त सुंदर दिसू नये. इतकंच नव्हे तर आपल्या शंकेपोटी तिने स्वतःच्याच मुलालाही ठार मारलं. आतापर्यंत तिने एकूण चार लहान मुलांचे बळी घेतले आहेत, यात तिचा स्वतःचा मुलगाही आहे.

नेमकं काय घडलं?

१ डिसेंबर रोजी पानीपतजवळील नौल्था गावात लग्नसमारंभासाठी आलेल्या कुटुंबाच्या घरी स्टोअर रूममधील पाण्याच्या टबमध्ये ६ वर्षीय विधी नावाच्या मुलीचा मृतदेह आढळला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना ही भयानक हत्या करणारी स्त्री सापडली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिलेने कबुली दिली की, “जेव्हा-जेव्हा मला माझ्यापेक्षा जास्त सुंदर मूल-मुलगी दिसायची, तेव्हा मी तिला/त्याला पाण्यात बुडवून मारून टाकायचे. यात माझ्या स्वतःच्या मुलालाही मी ठार मारलं, जेणेकरून कोणाला शंका येऊ नये.”

वाचा: स्मृती मानधनाच्या लग्नाबाबत मोठी अपडेट! नवी तारीखच समोर, कुणासोबत होणार विवाह?

आतापर्यंत या महिलेने चार मुलांची हत्या केली आहे. यात तिचा स्वतःचा मुलगा आणि विधीचा समावेश आहे. उरलेल्या दोन मुलांच्या मृत्यूला कुटुंबीयांनी अपघाती मृ्त्यू समजले होते. पण आता सत्य उघड झाले आहे. त्यांनी या महिलेला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या महिलेला अटक तर केली आहे. आता तिला कोणती शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहे ही महिला?

ही महिला मूळची पानीपतजवळील सिवाह गावातील आहे आणि सोनीपत जिल्ह्यातील बोहड गावात तिचा विवाह झाला होता. तिला पोलिसांच्या सीआयए-वन टीमने 36 तासांच्या आत अटक केली आहे. पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंह (आयपीएस) यांच्या नेतृत्वात ही मोठी कामगिरी झाली आहे. आज तिला न्यायालयात हजर केलं जाईल आणि पुढील चौकशीसाठी रिमांडवर घेतलं जाईल. ही घटना ऐकून मन सुन्न होतं. एका आईनेच लहान बाळांना फुलासारखं जपण्याऐवजी एवढ्या क्रूरपणे संपवले.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.