चोरट्याची हिंमत तर पहा… भरदिवसा घरात घुसून वृद्ध महिलेला लुटले !

मंगळवारी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान त्यांच्या घराबाहेर कुणीतरी उभं असल्याचं सौशम्मा यांना दिसलं. त्यामुळे दूधवाला आला असेल असं समजून त्यांनी दार उघडून पाहिलं.

चोरट्याची हिंमत तर पहा... भरदिवसा घरात घुसून वृद्ध महिलेला लुटले !
घरात घुसून वृद्धेची सोनसाखळी लुटलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 7:21 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून गळ्याला चाकू (Knife) लावत तिच्या गळ्यातली सोनसाखळी (Gold Chain) लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जबरी चोरी (Theft)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दिवसाढवळ्या घरात घुसून चोरीची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एकुलता एक मुलगा अमेरिकेत असल्याने वृद्ध दाम्पत्य एकटेच राहते

अंबरनाथ पश्चिमेच्या फातिमा शाळेजवळ कॅनरा बँकेला लागून दिलीप निवास नावाची इमारत आहे. या इमारतीत पहिल्या मजल्यावर सौशम्मा वर्गीस आणि त्यांचे पती हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्याला आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत वास्तव्याला आहे.

दूधवाला आला समजून महिलेने दरवाजा उघडला

मंगळवारी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान त्यांच्या घराबाहेर कुणीतरी उभं असल्याचं सौशम्मा यांना दिसलं. त्यामुळे दूधवाला आला असेल असं समजून त्यांनी दार उघडून पाहिलं असता तोंडाला स्कार्फ बांधलेला एक अनोळखी तरुण तिथे उभा होता.

हे सुद्धा वाचा

दरवाजा उघडताच चोरटा घरात शिरला आणि सोनसाखळी खेचली

हा तरुण सौशम्मा यांच्या घरात घुसला आणि त्यांना सोफ्यावर बसवत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढू लागला. सौशम्मा यांनी विरोध करताच या चोरट्याने कमरेला लावलेला चाकू काढून त्यांच्या गळ्याला लावला आणि जबरदस्तीने त्यांची सोनसाखळी हिसकावत पळून गेला.

प्रतिकार करताना महिलेच्या हाताला दुखापत

यावेळी प्रतिकार करताना सौशम्मा यांच्या हाताला चाकू लागला. यानंतर चोरटा पळून गेला. या घटनेनंतर सौशम्मा वर्गीस यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रमिला अलवारीस यांना फोन करून बोलावलं आणि त्यानंतर प्रमिला यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.

दरम्यान, आमच्या इमारतीत सगळे वृद्ध नागरिक एकटेच राहात असून आमच्या सुरक्षेची पोलिसांनी काळजी घ्यावी, असं आवाहन इमारतीतील रहिवासी प्रमिला अलवारीस यांनी केलंय.

Non Stop LIVE Update
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.