AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेने स्वत:च्याच घरात दागिन्यांची केली चोरी, अशी झाली पोलखोल

मालाड पूर्वेकडील ओमकार एसआरए सोसायटीतमध्ये एका दाम्पत्याच्या घरात घडलेल्या चोरीचा छडा कुरार पोलीसांनी लावला आहे.

महिलेने स्वत:च्याच घरात दागिन्यांची केली चोरी, अशी झाली पोलखोल
policeImage Credit source: socialmedia
| Updated on: Mar 03, 2023 | 12:26 PM
Share

मुंबई :  आपल्या स्वत:च्या घरी चोरी करून दागिने आणि रोकड पळविल्याचे वेगळेच प्रकरण पोलीसांनी उघडकीस आणत एका महिलेलाच या प्रकरणी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या  31  वर्षीय महिलेने सहा महिन्यांपूर्वी आपल्या पहिल्या पतीच्या मदतीने दुसऱ्या पतीच्या घरातील दागिने चोरल्याचे हे प्रकरण कुरार पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या महिलेने आपल्या पहिल्या पतीच्या मदतीने ही चोरीची योजना आखली होती. या महीलेने आपल्या दुसऱ्या पतीच्या घरातून 8.5 लाख रूपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. पोलिसांनी या चोरीचा कसा उलगडा केला हे महत्वाचे आहे.

‘मिडे डे’ ने दिलेल्या वृत्तानूसार हा प्रकार मालाड पूर्वेकडील ओमकार एसआरए सोसायटीतमध्ये एका दाम्पत्याच्या घरात घडला आहे. 7  मे 2022 रोजी ही महिलेने आपल्या दुसऱ्या पतीबरोबर सांगली येथील आपल्या गावी जाण्यापूर्वी ही स्वत:चेच घरफोडले. जेव्हा या महिलेचा पती इमारतीच्या खाली गाडी साफ करण्यासाठी गेला. त्यावेळी या महिलेने लॉकर तोडून दागिने आणि रोकड चोरी केली, त्यानंतर आतल्या दरवाजाला तुटलेला टाळा ठेवला आणि बाहेरचा दरवाजा लॉक केला आणि ते दोघेही गावी गेले.

गावाहून परतल्यावर गुन्हा उघड

13 मे रोजी ते दोघे आपल्या सांगली येथील गावाहून परतले तेव्हा महिला काही बहाण्याने बिल्डींगच्या खाली गेली. त्यामुळे पतीने दार उघडले तर आतल्या दरवाजा टाळा तुटला होता. तर लॉकरमधून 3.77 लाखाचे दागिने आणि 4.57 लाखाची रोकड गायब झाली होती. त्यामुळे पतीने तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. डीसीपी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेश गावडे, एपीआय पंकज वानखेडे आणि अन्य अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले गेले.

पोलीसांचा महिलेवरच संशय

या प्रकरणाचा संशय पहिल्यापासून या महिलेवरच होता. कारण दरवाजाचा आतला टाळा तोडला होता. बाहेरच्या दरवाजालाही काही झाले नव्हते त्यामुळे चोरी घरातल्याच कोणी तरी केल्याचा पेलीसांना सुरूवातीपासून संशय होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून फिंगर प्रिंटचे नमूने घेतले. या फिंगर प्रिंटचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराची पत्नीला चौकशीसाठी पाचारण केले. मंगळवारी या महिलेने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर कुरार पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्हा केल्याची कबूली दिली

महिलेने आपल्या जबाबात आपल्या पहिल्या पतीच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. महिलेचा पहीला पती आपल्या सतरा वर्षांच्या मुलासह मालवणी रहात असल्याचे उघडकीस आहे. तसेच या महिलेच्या पहिल्या पतीने आपल्या घरी यापूर्वीही अनेक वस्तू गायब झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. सध्या या महिलेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.