गुप्तधनासाठी वारंवार तगादा लावत होती महिला, मांत्रिकाने ‘असा’ काढला काटा

आरती सामंतचा मृतदेह शुक्रवारी पाडळी खुर्द येथील एका शेतात आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच करविर पोलिसांनी घटनास्थळी धाव मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

गुप्तधनासाठी वारंवार तगादा लावत होती महिला, मांत्रिकाने 'असा' काढला काटा
घरगुती भांडणातून पतीकडून पत्नीची हत्या
Image Credit source: t v 9
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 01, 2022 | 11:38 PM

भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर : गुप्तधनासाठी वारंवार तगादा लावत असल्याने मांत्रिकाने महिलेची हत्या (Women Murder) केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील शुक्रवार पेठ (Kolhapur Shukravar Peth) येथे उघडकीस आली आहे. आरती सामंत असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे, तर नामदेव पोवार असे हत्या करणाऱ्या आरोपी मांत्रिकाचे नाव आहे. याप्रकरणी करविर पोलिसात (Karvir Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करविर पोलिसांनी आरोपी नामदेव पोवारला अवघ्या 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत.

शुक्रवारी एका शेतात महिलेचा मृतदेह सापडला होता

आरती सामंतचा मृतदेह शुक्रवारी पाडळी खुर्द येथील एका शेतात आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच करविर पोलिसांनी घटनास्थळी धाव मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरु केला.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला बेड्या

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच मयत महिलेची कॉल हिस्ट्री आणि अन्य तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. आरोपी नामदेव हा राधानगरी तालुक्यातील जोगेवाडी येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी आरोपीची गठडी वळत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरती ही सतत गुप्तधन काढून दे असा तगादा नामदेवकडे लावत होती. यामुळे आरोपीने तिचा काटा काढला.

पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, करविरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि सायबर शाखेने संयुक्तपणे तपास यंत्रणा राबवत काही तासातच आरोपीला जेरबंद केलं.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें