AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपराजधानीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ‘असा’ अडकला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मॉडेलिंगसाठी वाट्टेल ते करायला तयार होती. तिने फोटोसेशन करून घेतले होते. अनेक कंपनीकडे फोटो पाठवूनही तिला कुठूनही ऑफर्स येत नव्हत्या. यामुळे काही कालावधीनंतर ती नैराश्यात गेली होती.

उपराजधानीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 'असा' अडकला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
भाईंदरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाशImage Credit source: Google
| Updated on: Feb 15, 2023 | 6:32 PM
Share

नागपूर / सुनील जाधव (प्रतिनिधी) : चंदेरी दुनियेच्या आकर्षणातून तरुणींची फसवणूक होण्याचे प्रकार खूप घडत आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांप्रमाणेच नागपूरमध्येही तरुणींना चंदेरी दुनियेच्या मोहपाशात अडकवून त्यांना वेश्याव्यवसायात लोटले जात आहे. नुकत्याच उघडकीस आलेल्या घटनेने हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मॉडलिंगचे स्वप्न उराशी बाळगून घराबाहेर पडलेल्या तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये सहभागी करून घेतले गेले. हा प्रकार उघड झाल्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका दलालाला अटक केली असून, त्याच्या चौकशीतून विविध धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. विक्की राजू कदमवार असे अटक केलेल्या 31 वर्षीय दलालाचे नाव आहे.

तरुणी पैशांच्या लालसेने सेक्स रॅकेटकडे वळली!

फसवणूक झालेली तरुणी ही मुळची मध्यप्रदेशच्या पांढुर्णा जिल्ह्यातील आहे. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ही तरुणी घरातून आली होती. याचदरम्यान तिचा नागपूर येथील काही लोकांशी संबंध आला.

मॉडेलिंगसाठी वाट्टेल ते करायला तयार होती. तिने फोटोसेशन करून घेतले होते. अनेक कंपनीकडे फोटो पाठवूनही तिला कुठूनही ऑफर्स येत नव्हत्या. यामुळे काही कालावधीनंतर ती नैराश्यात गेली होती.

तिला या नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी आणि सहज पैसे कमावण्यासाठी तिच्या मैत्रिणींनी चुकीचा मार्ग दाखवला आणि ती तरुणी सेक्स रॅकेटच्या दिशेने वळली.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केली कारवाई

दरम्यानच्या काळात पीडित तरुणीची अटक दलाल विक्कीशी ओळख झाली होती. त्याच्याच सांगण्यावरून ती ‘फोटो शूट’च्या नावाखाली देहव्यापारात सहभागी झाली होती. या सर्व प्रकारची गुप्त माहिती नागपूर पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी डमी ग्राहकामार्फत सापळा रचला आणि पोलीस विक्कीपर्यंत पोहोचले. विकी हा सेक्स रॅकेटमध्ये मिळणाऱ्या पैशांपैकी 60 टक्के रक्कम पीडित तरुणीला देत असे.

पोलिसांनी डमी ग्राहकामार्फत कारवाई करताना विकीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध विविध भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विक्की गेल्या अनेक वर्षापासून देहाव्यापारात दलाल म्हणून सक्रिय आहे.

आरोपीने आतापर्यंत अनेक मुलींना देहव्यापारात ढकलले

आरोपीने आतापर्यंत अनेक अल्पवयीन मुली आणि शाळकरी मुलींना देहव्यापारात ढकलले आहे. तो नागपुरातील ओयो हॉटेल्स आणि इतर नामांकित हॉटेल्समध्ये रूम बुक करून ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना मुली पुरविण्याचे काम करायचा. नागपूर पोलिसांनी एका नामांकित हॉटेलमध्ये छापा टाकून केलेल्या कारवाईत ही धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.