AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनी हत्याकांड प्रकरण, खटल्याचा निकाल जाहीर, सातही आरोपींना सुनावली ‘ही’ शिक्षा

भंडाऱ्यातील बहुचर्चित सोनी हत्याकांड प्रकरणाचा आज जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला. तब्बल नऊ वर्षांनी या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सोनी हत्याकांड प्रकरण, खटल्याचा निकाल जाहीर, सातही आरोपींना सुनावली 'ही' शिक्षा
सोनी हत्याकांड प्रकरणी आरोपींना आजीवन कारावासImage Credit source: TV9
| Updated on: Apr 11, 2023 | 5:16 PM
Share

भंडारा / तेजस मोहतुरे : भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज निकाल लागला. या हत्याकांड प्रकरणातील सातही आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा आणि दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली. जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश अंसार यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. सात जणांनी चिमुकल्यासह तिघांची हत्या केली होती. विशेष म्हणजे सोनी कुटुंबातील मयत मुलाचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशीच मुलाला न्याय मिळाला आहे.

2014 मध्ये झाली होती हत्या

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा या तिघांचा 26 फेब्रुवारी 2014 रोजी मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरातून 8.3 किलो सोने, 345 ग्रॅम चांदी आणि 39 लाख रुपये रोख असा एकूण साडेतीन कोटींचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना 24 तासाच्या आत अटक केली होती. यातील चार आरोपींना तुमसर येथून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एक आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती.

सरकारी पक्षाकडून उज्ज्वल निकम यांनी केला युक्तीवाद

मन सुन्न करणाऱ्या या हत्याकांड प्रकरणी आज आरोपींना शिक्षा झाल्याने सर्वत्र या निकालाचे स्वागत करण्यात येत आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर काल आरोप सिद्ध झाल्यानंतर सातही आरोपींना आज आजीवन कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. आरोपींमध्ये शाहनवाज ऊर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, केसरी ढोले रा.तुमसर, सोहेल शेख , रफीक शेख यांचा समावेश आहे. आरोपींच्यावतीने अँड धनंजय बोरकर यांनी बाजू मांडली.

Follow Us
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल.
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद.
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स....
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स.....
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी.
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....