फेसबुकवर तरुणीशी ओळख झाली, वर्षभर फोनवरुन प्रेमाच्या आणाभाका घेतल्या; मग…

फेसबुकवर मुलीच्या नावे फेक अकाऊंट बनवून शिक्षकाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. तरुणीच्या आवाजात बोलून तरुणाने शिक्षकाशी प्रेमाचे नाटक केले, मग 5 लाख रुपये लुटले.

फेसबुकवर तरुणीशी ओळख झाली, वर्षभर फोनवरुन प्रेमाच्या आणाभाका घेतल्या; मग...
फेसबुकवर फेक अकाऊंट बनवून शिक्षकाला गंडाImage Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 11:41 AM

रायगढ : छत्तीसगडमधील रायगढमध्ये फसवणुकीचे एक अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे. फेसबुकवर मुलीशी मैत्री करणे आणि प्रेम करणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर तब्बल 16 महिने शिक्षक त्या तरुणीसोबत फोनवर प्रेमाच्या आणाभाका घेत होत्या. या दरम्यान त्याने 5 लाख 60 हजार रुपये गर्लफ्रेंडला दिले. मात्र 16 महिन्यांनी जेव्हा गर्लफ्रेंडला प्रत्यक्ष भेटण्यासाठी पोहचला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मुलगी म्हणून तो ज्या तरुणीसोबत बोलत होता ती मुलगी नसून मुलगा होता. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शिक्षकाच्या लक्षात आले.

पीडित सरकारी शाळेतील शिक्षक

रायगढ जिल्ह्यातील लैलुंगा पोलीस ठाण्याअंतर्गत राहणारा पीडित विद्याचरण पैकरा एका सरकारी शाळेत पीटी शिक्षक आहे. त्याची नोव्हेंबर 2021 मध्ये फेसबुकवर सविता पैकरा नामक एका तरुणीशी ओळख झाली. मग दोघे मॅसेंजरवर बोलू लागले. यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली मग प्रेमात पडले. तरुणीने त्याला ती धरमजयगढ ब्लॉकमध्ये शिक्षक असल्याचे सांगितले. मग दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. यानंतर 16 महिने दोघे एकमेकांशी फोनवर बोलत होते.

गर्लफ्रेंडला भेटायला बोलावल्यानंतर धक्काच बसला

या काळात त्याने आपल्या गर्लफ्रेंडला विविध माध्यमांतून 5 लाख 60 हजार रुपये दिले. यानंतर पीडित शिक्षकाने तरुणीची भेट द्यायचे ठरवले. विद्याचरणने तरुणीला भेटायला बोलावल्यानंतर त्याला धक्काच बसला. कारण त्याच्याशी इतके महिने बोलणारी त्याची गर्लफ्रेंड मुलगी तरुणी नसून तरुण होता.

हे सुद्धा वाचा

फेसबुकवर झाली दोघांची ओळख

आरोपी तरुणाने मुलीच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट बनवून विद्याचरणला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. विद्याचरणने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये बातचीत सुरु झाली. आरोपी मुलीच्या आवाजात त्याच्याशी बोलायचा. विद्याचरण आपल्या जाळ्यात फसल्याची खात्री झाल्यानंतर त्याने त्याच्याकडे पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली.

आरोपीला अटक

यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विद्याचरणने पोलीस ठाणे गाठत फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याविरोधात कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आयुष्यमान खुराना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.