साहेब, त्याच्याकडे माझा अश्लील व्हिडीओ; महिला शेजारच्या तरुणाची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पण…
एका महिलेने शेजारी राहणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आरोप आहे की, शेजारी राहणाऱ्या तरुणाने ती बाथरूममध्ये आंघोळ करत असताना तिचा अश्लील व्हिडीओ बनवला. आरोपी सध्या फरार आहे, आणि त्याचा शोध घेतला जात आहे.

एका महिलेने शेजारी राहणाऱ्या तरुणावर ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप केला आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, शेजारी राहणाऱ्या शुभमने तिचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांनाही समोरासमोर बसवले. तरीही तरुणामध्ये काहीच बदल झाला नाही. त्यामुळे महिलेने पुन्हा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. आता पोलीस फरार असलेल्या शेजाऱ्याचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
ही घटना उत्तर प्रदेशमधील आगरा येथील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथील एक महिला रडत-रडत पोलीस ठाण्यात पोहोचली आणि म्हणाली, “साहेब, माझा शेजारी मला सतत ब्लॅकमेल करत आहे. त्याच्याकडे माझा अश्लील व्हिडीओ आहे. मी विरोध केला तर तो माझ्यावर जबदस्ती करतो.”
वाचा: रस्त्यावर जेवण, पांढरे कपडे; सुपरस्टार रजनीकांत यांनी सुरु केली आध्यात्मिक यात्रा
पोलिसांनी घडलेला संपूर्ण प्रकार ऐकला. पण ते ऐकून चकीत झाले. त्यांनी महिलेला शांतपणे बसवून संपूर्ण प्रकरणाची विचारणा केली. महिला म्हणाली, “साहेब, माझ्या घरात पाण्याची अडचण होती. बाथरुमचे काम सुरु असल्यामुळे मी माझ्या दिराच्या घरी आंघोळीसाठी गेले होते. याचवेळी शेजारी राहणाऱ्या शुभमने लपून-छपून माझा आंघोळीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओ बनवल्यावर तो मला ब्लॅकमेल करू लागला. मी विरोध केला तेव्हा त्याने माझ्यावर जबरदस्ती केली.”
पीडितेने पुढे सांगितले, “मी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणाला ठाण्यात बोलावले आणि दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. पण समजावल्यानंतर काही दिवसांनी त्याने पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात केली. मी त्याच्यामुळे वैतागले आहे. तो मला सतत धमक्या देत आहे आणि सर्वांसमोर छेडछाड करत आहे. कृपया त्याच्यावर कारवाई करा.”
पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी महिलेची तक्रार ऐकून प्रकरण दाखल केले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले, पण तो फरार होता. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले, “महिलेच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे, आणि लवकरच त्याला अटक केली जाईल.”
