शिवसेना नगरसेवकाचा कोपरगाव नगर परिषदेत राडा, उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप

कोपरगाव शहरात आरोपींचे अवैध टपरीचे अतिक्रमण रात्रीच्या सुमारास नगरपरिषदेने काढल्याचा राग मनात धरून नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी थेट पालिकेत येऊन उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे

शिवसेना नगरसेवकाचा कोपरगाव नगर परिषदेत राडा, उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप
आरोपींवर कारवाईसाठी पालिका कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

अहमदनगर : शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव नगर परिषदेत राडा घातल्याचं समोर आलं आहे. अहमदनगरमधील कोपरगाव नगर परिषदेतील उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना नगरसेवक योगेश बागुल यांच्यासह काही जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. पालिकेच्या कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केल्याचाही दावा केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

कोपरगाव शहरातील पूनम चित्रपट गृहासमोरील आरोपींचे अवैध टपरीचे अतिक्रमण रात्रीच्या सुमारास नगरपरिषदेने काढल्याचा राग मनात धरून नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी थेट पालिकेत येऊन उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण केली आणि सर्वं वस्तूंची तोडफोड केली.

कोणाकोणावर गुन्हा

यामध्ये शिवनेनेचे माजी शहराध्यक्ष सनी रमेश वाघ, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक योगेश बागुल, उपजिल्हा प्रमुख कैलास द्वारकानाथ जाधव, बालाजी पंढरीनाथ गोर्डे यांच्यासह इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

कारवाईची मागणी

शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मारहाण करून पालिकेतील कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केली. या प्रकरणी जिल्ह्यातील सर्व पालिका कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी जिल्हाधिकारी संदीप निश्चित यांना निवेदन देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नाशिकमध्ये महिलेला मारहाण झाल्याचा दावा

दुसरीकडे, नाशिकच्या सिडको भागातील सोसायटीत किरकोळ कारणावरुन दोन गटांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. यावेळी वादात पडलेल्या महिलेलाही मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे. सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडून त्याच सोसायटीमध्ये राहत असलेल्या संबंधित महिलेला मारहाण झाल्याचा आरोप आहे. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

नाशकात फ्री स्टाईल हाणामारी, सोसायटी अध्यक्ष-सचिवांनी महिलेला मारहाण केल्याचा आरोप

ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला, 20 वर्षीय अट्टल चोरट्याला अटक

(Ahmednagar Kopargaon Nagar Parishad Ruckus Shivsena corporator allegedly beaten up officer)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI